Home /News /career /

सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर इथे मोठी पदभरती; 75 हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार

सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर इथे मोठी पदभरती; 75 हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

    कोल्हापूर, 21 जुलै: सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर (ZP Kolhapur Recruitment 2021) इथे वैद्यकीय पदाच्या जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.मायक्रोबायोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, एमडी फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्नोनिशियन, एक्स-रे टेक्नीशियन, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि एएनएम या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यातही ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी होणार भरती मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist) बालरोगतज्ञ (Pediatrician) एमडी फिजिशियन (MD Physician) इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) मेडिकल ऑफिसर (Medical Officer) लॅब टेक्नोनिशियन (Lab Technician) एक्स-रे टेक्नीशियन (X-Ray Technician) फार्मासिस्ट (Pharmacist) स्टाफ नर्स (Staff Nurse) एएनएम (ANM) शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित वैद्यकीय क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा - COEP Pune Recruitment: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे मोठी पदभरती; लगेचच करा अर्ज इतका मिळणार पगार मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist) - 75000/- बालरोगतज्ञ (Pediatrician) - 75000/- एमडी फिजिशियन (MD Physician) - 75000/- इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist) - 75000/- मेडिकल ऑफिसर (Medical Officer) -  60000/- लॅब टेक्नोनिशियन (Lab Technician) -  28000/- एक्स-रे टेक्नीशियन (X-Ray Technician) -  17000/- फार्मासिस्ट (Pharmacist) -  17000/- स्टाफ नर्स (Staff Nurse) -  20000/- एएनएम (ANM) -  18000/- अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Kolhapur

    पुढील बातम्या