जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / COEP Pune Recruitment: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे मोठी पदभरती; लगेचच करा अप्लाय

COEP Pune Recruitment: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे मोठी पदभरती; लगेचच करा अप्लाय

COEP Pune Recruitment: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे मोठी पदभरती; लगेचच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 21 जुलै: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (COEP Pune Recruitment 2021) इथे लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.प्रयोगशाळा व्यवस्थापक, लेखा अधिकारी, लेखा सहाय्यक, सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऑपरेटर, बॉयलर ऑपरेटर आणि वॉर्डन या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी होणार भरती प्रयोगशाळा व्यवस्थापक (Laboratory Manager) लेखा अधिकारी (Accounting Officer) लेखा सहाय्यक (Accounting Assistant) सहाय्यक डेटाबेस ऑपरेटर (Assistant Database Operator) स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऑपरेटर (Scanning Electron) बॉयलर ऑपरेटर (Microscope Operator) वॉर्डन (Warden) हे वाचा - नोकरी शोधणाऱ्यांसाठी Good News!याठिकाणी फक्त 4 तास काम करुन महिन्याला कमवा 60000 शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रामध्ये डिग्रीपर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अप्लाय करण्यासाठीचं शुल्क 500 / –रुपये असणार आहे. तर आरक्षित प्रवर्गासाठी 250 / –रुपये शुल्क असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात