Home /News /career /

योग प्रशिक्षकांनो, 'या' जिल्हा परिषद NHM मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; कसं कराल अप्लाय; वाचा

योग प्रशिक्षकांनो, 'या' जिल्हा परिषद NHM मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; कसं कराल अप्लाय; वाचा

जिल्हा परिषद NHM सातारा भरती

जिल्हा परिषद NHM सातारा भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

  मुंबई, 01 डिसेंबर: जिल्हा परिषद NHM सातारा (Zilla Parishad Satara, National Health Mission Satara) इथे लवकरच योग शिकवणाऱ्या काही पदांच्या 95 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Satara Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. योग प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती (Yoga Teacher Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती योग प्रशिक्षक (Yoga Instructor) - एकूण जागा 95 शैक्षणिक पात्रता योग प्रशिक्षक (Yoga Instructor) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी योग या विषयांमध्ये डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच/किंवा योग या विषयांमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत योग प्रशिक्षक या पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. TISS Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत देणार Jobs इतका मिळणार पगार उमेदवारांना प्रत्येक योग शिबिरांनुसार 500/- रुपये प्रतिशिबीर इतकं मानधन दिलं जाणार आहे. उमेदवारांना दर महिन्याला आठ शिबीर घेण्याची परवानगी असणार आहे. यावर एकही शिबीर घेता येणार नाही. अशा पद्धतीनं होणार निवड उमेदवारांना त्यांच्या शिक्षण आणि अनुभवानुसार मार्क्स दिले जाणार आहेत. ते पुढील प्रमाणे असणार आहेत. डिप्लोमा इन योग - 10 मार्क्स डिग्री इन योग - 10 मार्क्स शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत योग प्रशिक्षक या पदाचा अनुभव - 10 मार्क्स प्रात्यक्षिक आणि मुलाखातूद्वारे इतर मार्क्स दिले जाणार आहेत. अशा पद्धतीनं ज्या उमेदवारांना अधिक मार्क्स असतील अशा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सुवर्णसंधी! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 'या' पदांसाठी Vacancy; 75,000 रुपये पगार अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 06 डिसेंबर 2021
  JOB TITLE ZP Satara Recruitment 2021
  या जागांसाठी भरती योग प्रशिक्षक (Yoga Instructor) - एकूण जागा 95
  शैक्षणिक पात्रता या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी योग या विषयांमध्ये डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच/किंवा योग या विषयांमध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत योग प्रशिक्षक या पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी शिक्षण हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार उमेदवारांना प्रत्येक योग शिबिरांनुसार 500/- रुपये प्रतिशिबीर इतकं मानधन दिलं जाणार आहे. उमेदवारांना दर महिन्याला आठ शिबीर घेण्याची परवानगी असणार आहे. यावर एकही शिबीर घेता येणार नाही.
  अशा पद्धतीनं होणार निवड डिप्लोमा इन योग - 10 मार्क्स डिग्री इन योग - 10 मार्क्स शासकीय किंवा निमशासकीय संस्थेत योग प्रशिक्षक या पदाचा अनुभव - 10 मार्क्स प्रात्यक्षिक आणि मुलाखतीद्वारे इतर मार्क्स दिले जाणार आहेत.
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://nhmsatararecruitment.com/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Jobs, Satara

  पुढील बातम्या