मराठी बातम्या /बातम्या /करिअर /पुण्याची सरपंच लेक झाली न्यायाधीश, मोहिनी भागवत यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड

पुण्याची सरपंच लेक झाली न्यायाधीश, मोहिनी भागवत यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड

ॲड. मोहिनी बापूराव भागवत

ॲड. मोहिनी बापूराव भागवत

विद्यमान सरपंच ते न्यायाधीश अशी वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 18 जानेवारी : पुणे जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरपंच तरुणीची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड झाली आहे. ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांनी सरपंच ते न्यायाधीश असा प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

दौंड तालुक्यातील मळद गावच्या विद्यमान सरपंच ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. विद्यमान सरपंच ते न्यायाधीश अशी वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

हेही वाचा - यशाचा एकच फॉर्म्युला.. 600 पेक्षा जास्त सोलो परफॉर्मन्स देणारी डान्सर कशी झाली IAS अधिकारी?

ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) या शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांनी शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन यश संपादन केरत नव्या पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. मोहिनी भागवत यांचे पती ॲड. बापूराव भागवत यांचीही त्यांना यासाठी मोलाची साथ लाभली. त्यांचे पती हे दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. ॲड. मोहिनी बापूराव भागवत यांनी ची न्यायाधीश पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचे परिसरातून स्वागत होत आहे.

First published:

Tags: Pune, Sarpanch election, Success story