मराठी बातम्या /बातम्या /करिअर /यशाचा एकच फॉर्म्युला.. 600 पेक्षा जास्त सोलो परफॉर्मन्स देणारी डान्सर कशी झाली IAS अधिकारी?

यशाचा एकच फॉर्म्युला.. 600 पेक्षा जास्त सोलो परफॉर्मन्स देणारी डान्सर कशी झाली IAS अधिकारी?

IAS कविता रामू

IAS कविता रामू

कविता रामू यांनी वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षापासून नृत्य शिकण्यास सुरुवात केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 18 जानेवारी : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्या अनेकजण सरकारी नोकरीच्या तयारीसाठी आपले छंद वगैरेही मागे सोडतात. आज आपण अशाच एका महिला अधिकाऱ्याचा यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. IAS कविता रामू या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत. त्यांनी 600 हून अधिक शोमध्ये सोलो परफॉर्मन्स दिला आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्यांनी नृत्याचे व्यावसायिक प्रशिक्षण घेणे सुरू केले. हे सर्व असूनही त्यांनी आपल्या ध्येयापासून कधीही विचलित न होता आपला अभ्यास चालू ठेवला. IAS कविता रामू यांच्या यशस्वी प्रवासाबाबत जाणून घेऊयात.

IAS कविता रामू यांचा जन्म मदुराई, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील एम रामू हे देखील आयएएस अधिकारी होते. तर त्यांच्या आई मणिमेगाली लग्नापूर्वी अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. कविता यांच्या पालकांनी त्यांना अभ्यासासोबतच कलेची आवड निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले. कविता रामू यांनी नृत्याचे व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे.

कविता रामू यांनी वयाच्या अवघ्या 4 व्या वर्षापासून नृत्य शिकण्यास सुरुवात केली. त्यांनी गुरु नीला यांच्याकडून भरतनाट्यमचे मूलभूत शिक्षण घेतले. मग लवकरच नृत्य त्याची आवड बनली. आयएएस कविता रामू या काही नागरी सेवा अधिकार्‍यांपैकी एक आहेत ज्यांनी स्वतःला तिच्या कलेसाठी देखील समर्पित केले. ती एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना आहे.

IAS कविता रामू यांनी आतापर्यंत 600 हून अधिक सोलो स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत. 1981 मध्ये वयाच्या 8 व्या वर्षी त्यांना पाचव्या जागतिक तमिळ परिषदेत सादरीकरण करण्याची संधी मिळाली. श्री झाकीर हुसेन यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे घेतले आहे. सनदी अधिकारी असल्याने कविता यांच्या वडिलांची काही वर्षांच्या अंतराने बदली व्हायची. कविता 10 वर्षांच्या असताना त्यांच्या कुटुंबीयांनी चेन्नईला शिफ्ट होण्याची योजना आखली होती.

हेही वाचा - मित्रांनीही विश्वास ठेवला नाही, पण अडचणींचा सामना करुन गड्यानं मैदान मारलंच, झाला IAS

आयएएस कविता रामू यांचे सुरुवातीचे शिक्षण तामिळनाडूच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पूर्ण झाले आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. वडिलांच्या प्रेरणेने कविताने पदवीसह नागरी सेवेची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांनी लोक प्रशासनात एमएची पदवी मिळवली. त्या कॉलेज टॉपर होत्या.

IAS कविता रामू यांनी 1999 साली तामिळनाडू राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. पण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचे त्यांचे मुख्य ध्येय होते. भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवताना UPSC परीक्षेची तयारीही केली. 2002 मध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्यावेळी, यूएसए आणि कॅनडामध्ये त्यांच्या कामगिरीशिवाय, त्या IAS अधिकारी देखील बनल्या. त्यांचा प्रवास आजच्या तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

First published:

Tags: Ias officer, Inspiring story, Success story, Upsc, Upsc exam