मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Wipro NTH Recruitment: Wipro मध्ये फ्रेशर्ससाठी Off Campus ड्राईव्ह; 'या' पदांसाठी मोठी भरती; 3.5 लाख पगार

Wipro NTH Recruitment: Wipro मध्ये फ्रेशर्ससाठी Off Campus ड्राईव्ह; 'या' पदांसाठी मोठी भरती; 3.5 लाख पगार

Wipro Elite Off Campus FY’20 & FY’21 असं या ऑफ कॅंपस ड्राईव्हचं नाव असणार आहे.

Wipro Elite Off Campus FY’20 & FY’21 असं या ऑफ कॅंपस ड्राईव्हचं नाव असणार आहे.

Wipro Elite Off Campus FY’20 & FY’21 असं या ऑफ कॅंपस ड्राईव्हचं नाव असणार आहे.

मुंबई, 03 ऑक्टोबर: देशातील नामांकित IT कंपनी Wipro (Wipro jobs for freshers) मध्ये लवकरच फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती होणार आहे. Wipro नं फ्रेशर्ससाठी Wipro Off Campus Drive आयोजित केलं आहे. या माध्यमातून फ्रेशर्सना नोकरची संधी मिळणार आहे. Wipro ला कोरोनाच्या काळातही मोठा नाफेझ आला आहे त्यामुळे आता Wipro कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या (Wipro NTH latest jobs) तयारीत आहे. 2020 आणि 2021 या बॅचेसच्या उमेदवारांना या ऑफ कॅंपस ड्राइव्हसाठी अप्लाय करता येणार आहे. Wipro Elite Off Campus FY’20 & FY’21 असं या ऑफ कॅंपस ड्राईव्हचं नाव असणार आहे.

या पदांसाठी ड्राईव्ह

प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी CS/ IT/ Circuital या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेसमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना दहावीमध्ये 60 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना बारावीमध्ये 60 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे.

ग्रॅज्युएशनमध्ये उमेदवारांना 65 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे  किंवा 6.5 CGPA असणं अनिवार्य आहे.

हे वाचा - Microsoft Recruitment: फ्रेशर्ससाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीची मोठी सुवर्णसंधी

इतर महत्त्वाचे निकष

ज्या उमेदवारांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये Wipro च्या कोणत्याही भरतीसाठी अप्लाय केलं आहे अशा उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

उमेदवरांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून फुल टाइम पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

उमेदवारांचे कोणतेही बॅकलॉग असतील तर अशा उमेदवारांना अप्लाय करता येणार नाही.

या पदांसाठी  3.5 लाख रुपये प्रतिवर्ष इतका पगार असणार आहे.

अशा प्रकारे होणार निवड

सुरुवातीला उमेदवारांची Aptitude Test घेण्यात येणार आहे. यामध्ये Logical Ability, Quantitative Ability, English (verbal) Ability या संबंधीचे प्रश्न असणार आहेत. या टेस्टसाठी 48 मिनिटांची वेळ देण्यात येणार आहे.

यानंतर Written Communication Test म्हणजे निबंध लिखाणाची टेस्ट असणार आहे. यासाठी उमेदवारांना 20 मिनिटांची वेळ देण्यात येणार आहे.

यानंतर Online Programming Test घेण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांना दोन प्रोग्रॅम्सना कोडिंग करायची आहे. यासाठी एक तासाचा कालवधी देण्यात येणार आहे.

उमेदवार यासाठी Java, C, C++, or Python यापैकी कोणतीही एक लँग्वेजची निवड करू शकणार आहेत.

सर्व झाल्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा Technical Interview आणि HR Interview होणार आहे.

.

हे वाचा -  आठवडाभर ऑफिसचं काम करून कंटाळा आलाय? मग सुटीच्या दिवशी करा 'हे' भन्नाट कोर्सेस

असं करा अप्लाय

सुरुवातीला https://careers.wipro.com/careers-home.या ऑफिशिअल वेबसाईटला ओपन करा.

यानंतर Wipro Elite NTH 2022 Off Campus Drive ही लिंक शोध.

यानंतर Register Now वर क्लिक करा.

नवीन टॅबमध्ये विचारण्यात आली सर्व माहिती भरा.

यानंतर सर्व तपशील तपासून Register वर क्लिक करा.

अशा पद्धतीनं रजिस्टर करू शकता.

परीक्षेची वेळ, आणि इतर संपूर्ण माहिती तुम्हाला मैलावर देण्यात येईल.

First published:

Tags: Career opportunities, जॉब