Home /News /career /

Microsoft Recruitment: फ्रेशर्ससाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीची मोठी सुवर्णसंधी; अशी होणार निवड

Microsoft Recruitment: फ्रेशर्ससाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीची मोठी सुवर्णसंधी; अशी होणार निवड

चला तर जाणून घेऊया पात्रतेविषयी आणि निवड प्रक्रियेविषयी.

    मुंबई, 02 ऑक्टोबर: IT कंपन्यांपैकी एक मायक्रोसॉफ्ट (Microsoft Recruitment 2021) या अम्पानित फ्रेशर्ससाठी नोकरीची लवकरच मोठी संधी उपलब्ध होणार आहे. कोरोना असतानाही यंदा सर्व IT कंपन्यांना  मोठा नफा मिळाला आहे. त्यामुळे अनेक IT कंपन्यांनी फ्रेशर्सना नोकरी (Microsoft recruitment for Freshers) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता Microsoft मध्ये कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन (IT company Freshers jobs) पूर्ण केलेल्या फ्रेशर्ससाठी जागा निघाल्या आहेत. चला तर जाणून घेऊया पात्रतेविषयी आणि निवड प्रक्रियेविषयी. या पदांसाठी भरती ग्रॅज्युएट फ्रेशर्स (Graduate Freshers) शैक्षणिक पात्रता या पदभरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाविषयी ज्ञान असणं विषयक आहे. संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हे वाचा - Infosys Recruitment : Infosys विविध पदांसाठी फ्रेशर्सना देणार नोकरीची संधी; 'या' पदांसाठी करा अर्ज पात्रता उमेदवार हे निरनिराळ्या शिफ्ट्समध्ये काम करण्यास सक्षम असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजी बोलण्याचा आणि लिहिण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना गणिताचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच हिशोबात चोख असणं आवश्यक आहे. उमेदवारांचं दहावीपासून शिक्षण चांगल्या मार्कांसह झालं असणं आवश्यक आहे. निवड प्रक्रिया या पदभरतीसाठी सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांचा टेक्निकल राउंड घेण्यात येणार आहे. यानंतर निवड सझालेल्या उमेदवारांचा HR राउंड होणार आहे. अशा पद्धतीनं करा अर्ज सुरुवातीला www.microsoft.com या ऑफिशिअल वेबसाईटला ओपन करा. त्यानंतर पेजच्या सर्वात खालच्या भागाला Job Search वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा देश निवडा. आता तुम्हाला Microsoft Recruitment 2021 या लिंकवर क्लिक करा. यानंतर सर्व काही डेटा एंटर करा आणि त्यानंतर Submit वर क्लिक करा. Microsoft च्या या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. हे वाचा - TCS YEP मुळे बेरोजगारीचं टेन्शन होईल दूर, 24800 पेक्षा जास्त जणांना मिळाली नोकरी Infosys कंपनीत भरती Infosys मध्ये System Engineer पदाच्या काही जागांसाठी नोकरीची संधी मिळणार आहे. पदवीधर फ्रेशर्ससाठी हा जॉब असणार आहे. Bachelor Of Computer Science किंवा Bachelor of Engineering आणि IT क्षेत्राशी निगडित काही कोर्सेस केले असतील तर हा जॉब तुम्हाला मिळू शकणार  आहे. तसंच या जॉबसाठी Coimbatore हे लोकेशन राहणार आहे. या मध्ये उमेदवारांना कॉल्स, मेल्स यांना मॉनिटर करत राहावं लागणार आहे. तसंच Linux, Automation, E-Commerce यामध्ये उमेदवारांना काम असणार आहे. Service desk Management, Network, Linux हे स्किल्स उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Microsoft

    पुढील बातम्या