Home /News /career /

आठवडाभर ऑफिसचं काम करून कंटाळा आलाय? मग सुटीच्या दिवशी जपा तुमची आवड; करा 'हे' भन्नाट ऑनलाईन कोर्सेस

आठवडाभर ऑफिसचं काम करून कंटाळा आलाय? मग सुटीच्या दिवशी जपा तुमची आवड; करा 'हे' भन्नाट ऑनलाईन कोर्सेस

आज आम्ही तुम्हाला असे काही भन्नाट कोर्सेस (Online courses to do on vacation) सांगणार आहोत जे तुम्ही सुटीच्या दिवशी घरबसल्या करू शकता

    मुंबई, 03 ऑक्टोबर: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम (Work from home) सुरु आहे. तर काही कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जावं लागतंय. मात्र या सर्व गोष्टींमध्ये कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यात 'काम एके काम' हे सूत्र आठवडाभर मागे लागलं आहे. कामाच्या टेन्शनमध्ये अनेकदा कर्मचाऱ्यांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाहीये. सुटीच्या दिवशी आराम करावा की कुटुंबासह  यातच अनेकांचा दिवस निघतोय. मात्र या सगळ्यामध्ये एकच गोष्ट राहून जातेय ती म्हणजे छंद जपणं (Online Hobby classes) किंवा आवड जपणं. कामाच्या व्यतिरिक्त काही शिकण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र कामाच्या नादात आवड जपण्यास वेळ मिळत नाही. गृहिणींच्या बाबतीत असं अनेकदा होतं. आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही भन्नाट कोर्सेस (Online courses to do on vacation) सांगणार आहोत जे तुम्ही सुटीच्या दिवशी घरबसल्या करू शकता. तसंच आपली आवडही जपू शकता. चला तर मग जाणून घेऊया. फॅशन डिझायनिंग (Fashion Designing) अनेकदा महिला किंवा युवती यांना निरनिराळ्या प्रकारचे कपडे डिझाईन करण्याची आणि ते घालून बघण्याची आवड असते. यासाठी  डिझायनिंगचं शिक्षण घेण्याचीही इच्छा असते. मात्र काही कारणास्तव तसं होऊ शकत नाही. जॉब करताना किंवा घर सांभाळत असतानाही प्रत्यक्ष कॉलजेमध्ये जाऊन फॅशन डिझायनिंग (Online Fashion Designing Course) करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता हा कोर्स तुम्ही सुटीच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता. हे वाचा - खूशखबर! आता ज्येष्ठ नागरिकांनाही सहज मिळणार नोकरी,सुरू होतंय Employment Exchange वाद्य शिकणे (Instruments) अनेकांना लहानपणापासूनच एखादं वाद्य शिकायची खूप आवड असते. अनेकजण लहानपणी वाद्य शिकतातसुद्धा. मात्र काही कारणास्तव ते पूर्ण शिकून होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची आवड अर्धवट राहून जाते. पुढे ऑफिसच्या कामांमुळे ही इच्छा राहून जाते. मात्र आजकाल सर्व प्रकारची वाद्यं ऑनलाईन पद्धतीनं (Online instruments classes) शिकवली जात आहेत. तबला (Online tabla classes), गिटार (Online guitar learning), बासरी (Online Flute classes), ड्रम अशी अनेक वाद्यं लोक ऑनलाईन शिकत आहेत. त्यामुळे तुम्हीही तुमचं आवडतं वाद्यं ऑनलाईन शिकू शकता आणि सुटीच्या दिवशी ते वाजवण्याचा आनंद घेऊ शकता. क्राफ्ट किंवा चित्रकला शिकणे (Craft & Drawing) ड्रॉईंग, पेंटिंग, स्केचिंग (Online Sketching Classes) अशा अनेक प्रकारच्या चित्रकलेच्या पद्धती (Online drawing classes) आपण लहानपणी शिकतो किंवा काढून बघतो. मात्र अनेकांना याची प्रचंड आवड असते. ऑफिसच्या डेस्कवर किंवा जुन्या कामाच्या नसलेल्या कागदांवर असे लोक अनेक प्रकारची चित्रं काढून ठेवतात. मात्र यात पूढे काही शिकण्याची इच्छा राहून जाते. पण हेच तुम्ही आता सुटीच्या दिवशी करू शकता. ऑनलाईन कोर्सेसच्या (Online craft and arts classes) माध्यमातून तुम्ही ही कला जपू शकता. तसंच यात बिझिनेस सुरु करूनपैसे ही कमावू शकता. हे वाचा - कोरोनाकाळात घरबसल्या करा हे टॉप कोर्सेस आणि राहा अपडेट; मिळेल भरघोस पगार कुकिंग (Cooking) अनेक गृहिणी ऑफिस सांभाळून घर सांभाळत असतात. त्यामुळे त्यांना बरेचदा घाईमध्ये जेवण बनवूं ऑफिसमध्ये जावं लागतं. मात्र यामुळे त्यांना आपला पाककलेतील (Cooking classes career) आपला छंद जोपासता येत नाही. तसंच घरच्यांना कुठला नवीन पदार्थ बनवून खायला देता येत नाही. म्हणूनच अशा गृहिणी ऑनलाईन कुकिंग क्लासेस (Online cooking classes) करून निरनिराळे पदार्थ बनवू शकतात आणि कुटुंबातील सदस्यांना खूश करू शकतात.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career

    पुढील बातम्या