मुंबई, 16 ऑगस्ट: Google कंपनी सारखी मोठी कंपनी नाही, या कंपनीत जॉब मिळाला तर आपली लाईफ सेट आहे असं कित्येक जण म्हणत असतात. तसंच Google मध्ये जॉब लागल्यानंतर पगारही उत्तम असतो. मात्र याच गुगल कंपनीनं आता आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कढून टाकण्याची धमकी दिली आहे. तब्बल 200 कर्मचाऱ्यांना कामावरून टाकू अशी धमकी कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिली आहे. पण असं नक्की का? यामागचं कारण काय? Google सारख्या मोठ्या कंपनीवर अशी वेळ का आली? यामागची कारणं जाणून घेऊया. गूगल क्लाउड सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक म्हणतात, त्यांच्या सीनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं की कंपनी ओवरऑल सेल्स प्रोडविटीची समीक्षा करेल आणि जर लोकांच्या कामांचे परिणाम चांगले दिसत नाहीत तर ते त्यांना नोकरीवरून काढू शकतात. या इशाऱ्यानंतर कंपनीत काम करणारे कर्मचारी आपल्या नोकऱ्यांबाबत चिंतेत पडलेले दिसत आहेत. क्या बात है! Google कंपनी UG विद्यार्थ्यांना देतेय इंटर्नशिपची मोठी संधी; या लिंकवर लगेच करा अप्लाय काय आहेत यामागची कारणं Google चे CEO सुंदर पिचाई यांच्या मते, गुगलची उत्पादकता जिथे असायला हवी होती त्यापेक्षा कमी आहे. 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कमाई अपेक्षेपेक्षा कमकुवत होती, कारण ती पहिल्या तिमाहीत होती. गुगल कर्मचाऱ्यांना अधिकाधिक योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणं आवश्यक आहे, त्यासाठी कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स चेक करणंही आवश्यक आहे. तसंच कंपनीची कमाई गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये बरीच घसरली आहे. कंपनीचा रेव्हेन्यू गेल्या दोन वर्षांमध्ये 25 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे आता कंपनीला कर्मचाऱ्यांचा भर अधिक होतो आहे असंही बोललं जातंय. Google नागेल्या काही महिन्यांपासून आपली भरती प्रक्रियाही फ्रीझ करून ठेवलीआहे. ज्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना Google मध्ये घेतलं जात नाहीये. Google ही एकमेव कंपनी नाही जिने आपली नियुक्ती प्रक्रिया फ्रीझ केली आहे. याआधीही अनेक मोठ्या कंपन्यांनी अशा प्रकारे पावले उचलली आहेत. बारावीनंतर करिअर लवकर सुरू करायचंय? ‘हे’ डिप्लोमा कोर्सेस ठरतील उपयुक्त एकूणच काय तर आता google च्या कर्मचाऱ्यांवर जॉब गमावण्याच्या भीतीचं सावट आहे. मात्र असं असलं तरी Google सारख्या मोठ्या कंपनीला संकटातून बाहेर कसं पडावं याचा चांगलाच अनुभव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.