अहमदाबाद, 16 जानेवारी: हल्ली मंत्रिपदावर असलेली व्यक्ती तुम्हाला लोकांशी तुसडेपणाने वागणं किंवा वादामुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळत असेल. पण, गुजरातमध्ये मात्र एक मंत्री वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. गुजरातमधील एका मंत्र्याचा शौचालय स्वच्छ करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. गुजरातचे नवीन शिक्षण मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांचा शौचालय साफ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय. पानशेरिया हे सुरतमधील कामरेज मतदारसंघाचे आमदार आहेत. या विधानसभा क्षेत्रातील डुंगरा गावातील प्राथमिक शाळेचा आढावा घेण्यासाठी आमदार पोहोचले होते. या वेळी त्यांनी तिथे पाहणी केली असता त्यांना शौचायलं स्वच्छ दिसली नाहीत. त्यानंतर त्यांनी स्वतः झाडू आणि पाणी घेऊन ती शौचालयं स्वच्छ केली. हे करत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. त्यानंतर आमदार पानशेरिया यांचं नेटकरी खूप कौतुक करत आहेत. दरम्यान, शौचालय स्वच्छ केल्यानंतर त्यांनी सफाई करण्यात कोणतीही लाज आणि संकोच वाटता कामा नये, असं तिथल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगितलं. दरम्यान, आमदार असूनही शौचालय साफ करणारे हे प्रफुल्ल पानशेरिया कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आणि त्यांच्याकडे कोणती मंत्रिपदं आहेत, ते सविस्तर जाणून घेऊयात. 50:30:20 हे फक्त आकडे नाहीत तर आहे बचतीचा मॅजिकल फॉर्म्युला; असे वाचतील लाखो रुपये सामाजिक कार्यांमुळे मिळाली पानशेरियांना ओळख प्रफुल्ल पानशेरिया यांचा जन्म 29 डिसेंबर 1971 रोजी झाला. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. तरुणपणापासून भाजपशी संबंधित असलेले पानशेरिया 2012 मध्ये कामरेज विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले होते, पण 2015 मध्ये पाटीदार आंदोलन झालं आणि त्यानंतर 2017 साली झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं होतं. त्यांच्या जागी व्ही. डी. झालावाडिया यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र पानशेरिया यांनी आमदार नसतानाही समाजकार्य सुरूच ठेवल्याने अखेर गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घ्यावी लागली. पाटील यांनी भर सभेत पानशेरिया यांच्या कार्याचं कौतुक केलं होतं. त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा भाजपकडून तिकीट मिळालं. त्यांनी आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते राम धधुक यांचा पराभव करून कामरेज मतदारसंघातून विजय मिळवला. यानंतर सरकार स्थापन झाल्यावर पानशेरिया यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण सुरतमधून पूर्णेश मोदी आणि किशोर कनाणी या दिग्गजांऐवजी पानशेरिया यांना भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. Maha Metro Recruitment: महिन्याचा 2,80,000 रुपये पगार हवाय ना? मग आजच करा अप्लाय; उद्याची शेवटची तारीख संत समाजात पानशेरियांचं मोठं नाव कामरेज मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेल्या पानशेरिया यांना धार्मिक कार्यात प्रचंड रस आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान त्यांना संत समाजाचाही चांगला पाठिंबा मिळाला होता. कामरेज परिसरातील स्वामीनारायण संप्रदायाच्या संतांचाही त्यांना आशीर्वाद लाभला होता. याशिवाय पानशेरिया यांनी सुरतच्या बिल्डर लोकांमध्ये स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळेच ते कामरेजमधून मोठ्या मतांनी विजयी झाले होते. DRDO Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची बंपर लॉटरी; महाराष्ट्रात या तारखेला थेट होणार मुलाखती प्रफुल्ल पानशेरियांच्या नावे विक्रम प्रफुल्ल पानशेरिया यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात पाऊल ठेवलं होतं. ते सर्वांत आधी भाजपचे वॉर्ड जनरल मंत्री बनले होते. त्यानंतर ते सुरत शहर युवक भाजपचे उपाध्यक्ष आणि नंतर नगरसेवक झाले. पानशेरिया पहिल्यांदा 2005 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2010 मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले होते. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. प्रफुल्ल पानशेरिया यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे. यामुळेच त्यांनी अखंड रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला होता. यानंतर ते पहिल्यांदाच प्रसिद्धीत आले होते. सात दिवस चाललेल्या या रक्त शिबिरातून पानशेरिया यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती. आता पानशेरिया हे शिक्षण राज्यमंत्री असताना वेगळ्या कामांसाठी ओळखले जात आहेत. मागच्या काही वर्षांत एखाद्या मंत्र्याने स्वतः शौचालय स्वच्छ करण्याची ही गुजरातमध्ये पहिलीच वेळ आहे.
मोरबी-कच्छचे प्रभारी मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांना मोरबी आणि कच्छ जिल्ह्याचे प्रभारी मंत्री करण्यात आलं आहे. गुजरातचे शिक्षण राज्यमंत्री पानशेरिया यांनी पीजीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. त्यांनी वीर नर्मद विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमए केलं आणि नंतर त्याच विद्यापीठातून समाजशास्त्रात एमए केलं. पानशेरिया यांनी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण अमरेली आणि पुढील शिक्षण भावनगर इथून पूर्ण केलं. ते भूपेंद्र पटेल सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे संसदीय कामकाज, प्राथमिक, माध्यमिक आणि प्रौढ शिक्षण विभागासह उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.