जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 50:30:20 हे फक्त आकडे नाहीत तर आहे बचतीचा मॅजिकल फॉर्म्युला; असे वाचतील लाखो रुपये

50:30:20 हे फक्त आकडे नाहीत तर आहे बचतीचा मॅजिकल फॉर्म्युला; असे वाचतील लाखो रुपये

असे वाचतील लाखो रुपये

असे वाचतील लाखो रुपये

वाढत्या महागाईत आम्ही तुम्हाला एक बचतीचा फॉर्म्युला सांगतोय, ज्याच्या मदतीने तुम्ही पगारातून बचत करू शकता.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 जानेवारी:   आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी बचत सर्वांत आवश्यक गोष्ट आहे. महागाई सातत्याने वाढत आहे आणि त्यामुळे लोकांचे आर्थिक बजेट बिघडत आहे. अशा परिस्थितीत पैशांची बचत करणं खूप अवघड काम आहे. अनेकांना आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत आहे. या वाढत्या महागाईत आम्ही तुम्हाला एक बचतीचा फॉर्म्युला सांगतोय, ज्याच्या मदतीने तुम्ही पगारातून बचत करू शकता. हा फॉर्म्युला 50:30:20 म्हणून ओळखला जातो. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या खात्यात पगाराची जितकी रक्कम जमा होते, त्यावर तुम्ही 50:30:20 चा फॉर्म्युला लागू करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही व्यापारी असाल, तर महिन्याच्या पूर्ण उत्पन्नावर हा फॉर्म्युला लागू करून तुम्ही सर्व खर्च करूनही तुमच्या बचतीसाठी पैसे वाचवू शकता. तर या फॉर्म्युलाचं गणित समजून घेऊ. Maha Metro Recruitment: महिन्याचा 2,80,000 रुपये पगार हवाय ना? मग आजच करा अप्लाय; उद्याची शेवटची तारीख 50 टक्क्याचं काय करायचं समजा तुमचा पगार 40,000 रुपये महिना आहे आणि पैसे कसे वाचवायचे हे तुम्हाला कळत नाहीये. अशा परिस्थितीत सर्वात आधी 50:30:20 फॉर्म्युला समजून घेऊ. 50%+30%+20% म्हणजेच तुमच्या कमाईचे तीन भाग करा. त्यातले पहिले 50 टक्के खाण-पिणं, राहणं, शिक्षण यावर खर्च करा. यात घरभाडं किंवा होमलोनच्या ईएमआयचा समावेश आहे. यासाठी तुमच्या पगारातील अर्धा भाग म्हणजेच 20 हजार रुपये बाजूला काढून ठेवा. DRDO Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची बंपर लॉटरी; महाराष्ट्रात या तारखेला थेट होणार मुलाखती 30 टक्के कुठे खर्च करायचे आता उरलेल्या 50 टक्क्यांपैकी 30% तुमच्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करा. यामध्ये बाहेर फिरणं, चित्रपट पाहणं, बाहेर खाणं, गॅजेट्स, कपडे, कार, बाईक आणि मेडिकल खर्चांचा समावेश आहे. महिन्याला 40,000 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला या गोष्टींवर जास्तीत जास्त 12,000 रुपये खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. 50:30:20 फॉर्म्युलानुसार उर्वरित 20 टक्क्यांची तुम्ही बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.

News18लोकमत
News18लोकमत

उरलेल्या 20 टक्क्यांची इथे गुंतवणूक करा तुमच्या पगारात वरील दोन्ही खर्चानंतर 8 हजार रुपये उरतात, त्या पैशांची गुंतणूक करा. तुम्ही म्युच्युअल फंडात दर महिन्याला एसआयपी आणि बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. असं केल्यास तुम्ही एका वर्षात सुमारे एक लाख रुपये वाचवू शकाल. सुरुवातीला 20 टक्के रक्कम वाचवण्यात अडचण येत असेल, तर यादी बनवा, तुमच्या गरजेनुसार अत्यावश्यक खर्चांचा त्यात समावेश करा आणि गरजेचं नसेल तिथे खर्च करणं टाळा. बाहेर खाणं आणि महागडे कपडे घेणं टाळून तुम्ही बचत करू शकता. तसेच क्रेडिट कार्डच्या वापरावरही नियंत्रण ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात