मराठी बातम्या /बातम्या /करिअर /नोकरकपातीआधी सीईओ सुंदर पिचाई यांना गुगलने दिली होती मोठी पगारवाढ

नोकरकपातीआधी सीईओ सुंदर पिचाई यांना गुगलने दिली होती मोठी पगारवाढ

गुगलमधल्या नोकरकपातीआधी सीईओ सुंदर पिचाई यांना कंपनीने दिली होती मोठी पगारवाढ

गुगलमधल्या नोकरकपातीआधी सीईओ सुंदर पिचाई यांना कंपनीने दिली होती मोठी पगारवाढ

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र लिहून त्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचंही सांगितलं; मात्र या मोठ्या नोकरकपातीआधीच डिसेंबरमध्ये सुंदर पिचाई यांना मोठी पगारवाढ देण्यात आली होती.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 31 जानेवारी: इंटरनेटवरचं सर्वांत मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलने नुकतीच मोठी नोकरकपात केली. कंपनीच्या जगभरातल्या कार्यालयांमधून 12 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू देण्यात आला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र लिहून त्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचंही सांगितलं; मात्र या मोठ्या नोकरकपातीआधीच डिसेंबरमध्ये सुंदर पिचाई यांना मोठी पगारवाढ देण्यात आली होती.

    गुगलने नव्या वर्षात कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. कंपनीनं 12 हजार कर्मचाऱ्यांची केलेली हकालपट्टी ही अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट होती. सीईओ सुंदर पिचाई यांनी ‘लेऑफ’ची घोषणा करताना कर्मचाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या या कठीण काळात कंपनी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय. अर्थात पिचाई यांना मात्र या नोकरकपातीआधीच डिसेंबर 2022मध्ये मोठी पगारवाढ देण्यात आली होती.

    गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून त्यांना इक्विटी रिवॉर्ड देणार असल्याचं कंपनीनं जाहीर केलं होतं. पेआउटसाठी परफॉर्मन्सची गरज वाढवताना 2019मध्ये 43 टक्के असलेली परफॉर्मन्स स्टॉक युनिट्स 60 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहेत. यामुळे कंपनीच्या विकासावर पिचाई यांचा पगार जास्तीत जास्त अवलंबून असेल.

    गुगलच्या सीईओला दर 3 वर्षांनी इक्विटी मोबदला मिळतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पिचाई यांना PSUs चे 63 मिलियन अमेरिकन डॉलरचे लक्ष्य-मूल्याचे दोन भाग आणि Alphabet च्या प्रतिबंधित स्टॉक युनिट्सचे 84 मिलियन अमेरिकन डॉलर्सचं अनुदान मिळालं. पिचाई यांनी 2018मध्ये पॅकेज समाधानकारक योग्य असल्याचं सांगत इक्विटी मोबदला नाकारला होता.

    हेही वाचा: Viral Video : वरात यायला उशीर झाला, म्हणून गच्चीवर गेली नवरी आणि...

    नव्या वर्षात सीईओ सुंदर पिचाई यांनी टाउनहॉलमध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत पुन्हा एक धक्का दिला आहे. सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट या पदाच्या वरच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बोनसमध्ये कपात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्व पदांच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा मोबदला कंपनीच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे, असंही ते म्हणाले. पगारात कपात होण्याबद्दल त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नसला, तरी त्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

    गुगलने अलीकडेच मोठी नोकरकपात केली. लिंक्डइन या सोशल साइटवर गुगलच्या अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं होतं. हकालपट्टी झालेल्या अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पीरियडमध्ये संपूर्ण पगार दिला जाणार आहे. तसंच करारानुसार बोनस व इतर मोबदलाही मिळेल. अमेरिकेबाहेरच्या कर्मचाऱ्यांना त्या त्या देशातल्या कायद्याप्रमाणे मोबदला दिला जाईल, असंही पिचाई यांनी सांगितलं आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्यामुळे आता सुंदर पिचाई यांच्याही पगारात कपात होण्याची शक्यता आहे.

    First published:

    Tags: Google, Sundar Pichai