मुंबई, 01 फेब्रुवारी : एखाद्याला वाट पाहायला लावली, तर त्याची चिडचिड होते. विशेषतः ती मुलगी असेल, तर ती नक्कीच चिडते. अनेक चित्रपटांमध्ये यावर सीनही चित्रित केलेले असतात. वाट पाहून रुसलेल्या हिरॉइनला हसवण्यासाठी हिरो जिवाचा आटापिटा करतो असं चित्रपटांमध्ये नेहमी दिसतं. अशा सीनमध्ये काही गाणीही असतात. एकंदरीतच वाट पाहायला लावणं म्हणजे प्रेयसीचा राग ओढवून घेण्यासारखं असतं. त्यात ऐन लग्नात वरात उशिरा येऊन नवरीला वाट पाहायला लागली तर तिथे काय होऊ शकतं, याची कल्पनाच केलेली बरी. वरातीला उशीर झाल्यानं टेरेसवर वाट पाहणारी नवरी काय करते, हे एका व्हायरल व्हिडिओत पाहून अनेकांनी तो व्हिडिओ लाइक केलाय.
लग्नमंडपात तयार होऊन नवरी वाट पाहत बसली असेल आणि वरातीला उशीर झाला, तर नवरीची चिडचिड साहजिक आहे. बऱ्याचदा नवरी उशिरा आली तर 'आवरायला इतका वेळ लागतो का' असं ऐकवलं जातं; मात्र नवऱ्याची वरात उशिरा आली, तर ते सहज मान्य केलं जातं. काही वेळा नवरी मुलगी चिडून राग व्यक्त करते किंवा काही वेळेला गच्चीवर जाऊन वाट पाहत बसते.
View this post on Instagram
या व्हायरल व्हिडिओमध्येही नवरी वरातीची वाट पाहत गच्चीवर उभी दिसतेय. आता ती काय करणार याबाबत अनेकांना भीती वाटेल; पण प्रत्यक्षात काय घडतं हे पाहून युझर्सना आश्चर्य वाटतंय.
वरातीची वाट पाहून नवरी गच्चीवर जाते. मग नवऱ्याला शोधायला लागते. वरात कुठे पोहोचली तेही ती शोधते. पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर हसू दिसतं. नंतर मात्र ती चिडलेली व्हिडिओत दिसते. नंतर ती एका खुर्चीवर चढते. तिथून तिला नवरा दिसतो, मात्र तो आपल्याकडे पाहतच नाही, असं म्हणत ती थोडी नाराज होते. तेवढ्यात नवरा गच्चीकडे पाहतो व खूश होऊन नवरीही ओरडायला लागते.
नवऱ्यानं तिच्याकडे पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आलेलं हसू नेटिझन्सना खूप आवडत आहे. इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलंय. ‘जेव्हा वरात पोहोचायला उशीर होतो आणि व्हायरलही व्हायचं असतं,’ अशा आशयाची ओळ त्या व्हिडीओखाली लिहिलेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.