मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Option : फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करायचं आहे?; मग 'हे' एकदा वाचाच

Career Option : फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करायचं आहे?; मग 'हे' एकदा वाचाच

बऱ्याच जणांना फोटोग्राफीची आवड असते. छंद म्हणून फोटोग्राफी करणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही; पण फोटोग्राफी हा करिअरसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

बऱ्याच जणांना फोटोग्राफीची आवड असते. छंद म्हणून फोटोग्राफी करणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही; पण फोटोग्राफी हा करिअरसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

बऱ्याच जणांना फोटोग्राफीची आवड असते. छंद म्हणून फोटोग्राफी करणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही; पण फोटोग्राफी हा करिअरसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : सहसा आवडत्या क्षेत्रात करिअर (Career) करण्याकडेच कल असतो. काही तरुण विविध क्षेत्रांतल्या संधी, पैसा आदी गोष्टींचा आढावा घेऊन त्यानुसार करिअरसाठी क्षेत्र निवडतात. इयत्ता 10 वी आणि 12 वी हे करिअरसाठी टर्निंग पॉइंट्स मानले जातात. कारण या दोन्ही वर्षांत करिअरची दिशा निश्चित होत असते. फोटोग्राफी (Photography) हे कलेशी निगडित क्षेत्र आहे. बऱ्याच जणांना फोटोग्राफीची आवड असते. छंद म्हणून फोटोग्राफी करणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही; पण फोटोग्राफी हा करिअरसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. जाहिरात (Advertisement) आणि माध्यम (Media) क्षेत्रात फोटोग्राफरला विशेष संधी असते. त्याचप्रमाणे चित्रपट क्षेत्रदेखील (Cinema) फोटोग्राफरसाठी खुलं असतं. फोटोग्राफीविषयी उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्था देशात आहेत. याविषयी माहिती देणारं वृत्त `जनसत्ता`ने प्रसिद्ध केलं आहे. एका छायाचित्रातून हजार शब्द व्यक्त होतात, असं म्हटलं जातं. अर्थात यामागे फोटोग्राफरचं कौशल्य, दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीकडे हे गुण आणि कलात्मकता असेल, तर ती व्यक्ती उत्तम फोटोग्राफर (Photographer) होऊ शकते. करिअरसाठी फोटोग्राफी हा उत्तम पर्याय ठरतो. फोटोग्राफी या विषयात पदविका (Diploma) किंवा पदवी (Degree) घेतली असेल तर करिअरचे अनेक पर्याय खुले होतात. वेडिंग फोटोग्राफर, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर, ट्रॅव्हल फोटोग्राफर किंवा फोटोजर्नालिस्ट होणं शक्य आहे. तांत्रिक ज्ञान असेल तर तुम्ही इंडस्ट्रियल फोटोग्राफरही (Industrial Photographer) होऊ शकता. इंडस्ट्रियल फोटोग्राफीमध्ये मायक्रो फोटोग्राफीचा वापर करून फोटोग्राफर एखाद्या यंत्रातले शास्त्रीय बारकावे टिपू शकतो. तसंच, दुसरीकडे ऑटोमोबाइल किंवा मोठ्या मशीन्सचे फोटोदेखील काढू शकतो. हेही वाचा -  सरकारी नोकरी ते ही मुंबईत; मग गोल्डन चान्स सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक आणि करा अप्लाय देशातल्या अनेक संस्थांमध्ये पदविका किंवा पदवीच्या माध्यमातून फोटोग्राफीचं सर्वांगीण शिक्षण दिलं जातं. या संस्थांमध्ये दिल्ली कॉलेज ऑफ फोटोग्राफी, लाइट अ‍ॅंड लाइफ अ‍कॅडमी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिजिटल आर्ट अ‍ॅंड अ‍ॅनिमेशन, जवाहरलाल नेहरू आर्किटेक्चर अ‍ॅंड फाइन आर्ट्स विद्यापीठाचा समावेश आहे. या संस्थांमध्ये फोटोग्राफीचे दोन आठवडे ते दोन वर्षं कालावधीपर्यंतचे अनेक कोर्सेस (Courses) उपलब्ध आहेत. एक यशस्वी आणि व्यावसायिक फोटोग्राफर होण्यासाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी विषयातली पदवी किंवा पदविका असणं गरजेचं आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या संस्थांमार्फत उमेदवारांसाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतली जाते. या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संबंधित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. हेही वाचा -  JEE Advanced: 7 ऑगस्टपासून सुरु होणार परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन; तुमच्याकडे 'ही' कागदपत्रं रेडी आहेत ना? फोटोग्राफीचा बेसिक सर्टिफिकेट कोर्स करायचा असेल तर काही संस्थांमध्ये या कोर्सची फी 5 हजार ते 25 हजार रुपयांदरम्यान आहे. पदवी आणि पदविकेसाठी 50 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यान फी आहे. तसंच पदव्युत्तर पदवी डिप्लोमा कोर्ससाठी 1.5 लाख ते 3.5 लाख रुपयांदरम्यान फी आहे. बीएफए कोर्ससाठी 5 ते 7.5 लाख रुपये, तर एमएफए कोर्ससाठी 3 ते 5 लाख रुपयांदरम्यान फी आहे. याशिवाय कॅमेरा आणि लेन्ससाठीचा खर्च वेगळा असतो. या कोर्सेसपैकी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोर्स निवडू शकता आणि उत्तम फोटोग्राफर होऊ शकता.
First published:

Tags: Career, Career opportunities, Internet, Photography, Social media

पुढील बातम्या