जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JEE Advanced: 7 ऑगस्टपासून सुरु होणार परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन; तुमच्याकडे 'ही' कागदपत्रं रेडी आहेत ना?

JEE Advanced: 7 ऑगस्टपासून सुरु होणार परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन; तुमच्याकडे 'ही' कागदपत्रं रेडी आहेत ना?

JEE Advanced: 7 ऑगस्टपासून सुरु होणार परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन; तुमच्याकडे 'ही' कागदपत्रं रेडी आहेत ना?

उमेदवार 28 ऑगस्टपर्यंत अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. JEE Advanced 2022 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यास्टेप्स फॉलो करणं आवश्यक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 01 ऑगस्ट: दरवर्षी लाखो विद्यार्थी JEE Mains परीक्षा (JEE Mains Exam 2022) देतात. बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी या परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदा ही परीक्षा लवकरच होणार आहे. मात्र या परीक्षेनंतर JEE Advanced 2022 ही परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवार JEE Advanced 2022 साठी अधिकृत वेबसाइट - jeeadv.ac.in - 11 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. JEE Advanced 2022 होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी पेपर 1 सकाळी 9 ते दुपारी 12 आणि पेपर 2 2:30 ते 5:30 या वेळेत घेण्यात येईल. 23 ऑगस्ट रोजी जारी केले जाईल, उमेदवार 28 ऑगस्टपर्यंत अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. JEE Advanced 2022 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी यास्टेप्स फॉलो करणं आवश्यक आहे. तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महानगरपालिकेत या पदांसाठी भरती अशी करा नोंदणी JEE Advanced 2022 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - jeeadv.ac.in. होमपेजवर, JEE Main 2022 लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन विंडोवर नोंदणी करा. JEE Advanced साठी नवीन पासवर्ड तयार करा. JEE Advanced 2022 चा अर्ज भरा. स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा. JEE अॅडव्हान्स अॅप्लिकेशन फी भरा अर्ज सबमिट करा आणि सेव्ह करा. काही महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी इयत्ता 10, 12 ची मार्कशीट जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) शारीरिक अपंगत्व प्रमाणपत्र, किंवा PWD प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) जन्म प्रमाणपत्र इयत्ता 10वीच्या मार्कशीटपेक्षा वेगळे असल्यास नाव बदल दर्शवणारे राजपत्र सामान्य आर्थिक दुर्बल विभाग (GEN EWS) प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) ओबीसी नॉन-क्रिमी लेयर (ओबीसी एनसीएल) प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास). मोठी बातमी! CAT 2022 चं नोटिफिकेशन जारी; ‘या’ तारखेपासून सुरु होईल रजिस्ट्रेशन

    छायाचित्र, स्वाक्षरी, फोटो आयडी पुरावा, इयत्ता 12 वी मार्कशीट, वयाच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्र, नागरिकत्व प्रमाणपत्र / पासपोर्ट, प्रशस्तिपत्र (पर्यायी), ओसीआय / पीआयओ कार्ड आणि नाव बदल दर्शविणारी राजपत्र अधिसूचना, ज्या विद्यार्थ्यांची नावे सारखी नाहीत त्यांच्यासाठी त्यांचे वर्ग 10 किंवा जन्म प्रमाणपत्र.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात