• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • ISRO Recruitment 2021: विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथे इंजिनिअर्सच्या 167 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अप्लाय

ISRO Recruitment 2021: विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथे इंजिनिअर्सच्या 167 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    तिरुअनंतपुरम (केरळ), 04 ऑक्टोबर: ISRO - विक्रम साराभाई स्पेस सेंटर (ISRO-Vikram Sarabhai Space Center) इथे लवकरच तब्बल 167 जागांसाठी पदभरती (ISRO Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना  जारी करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट अप्रेन्टिस (ISRO Engineering Apprentice Recruitment) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती इंजिनिअरिंग अप्रेन्टिस (Engineering Apprentice) मॅनेजमेंट अप्रेन्टिस (Management Apprentice) एकूण जागा - 167 ISRO Recruitment 2021
    ISRO Recruitment 2021
    शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव इंजिनिअरिंग अप्रेन्टिस (Engineering Apprentice) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे. तसंच फुल टाइम इंजिनिअरिंग केलं असणं आवश्यक आहे.  यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार नाही. हे वाचा - Government Jobs: महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग इथे तब्बल 138 जागांसाठी भरती मॅनेजमेंट अप्रेन्टिस (Management Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित 60% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट किंवा कॅटरिंगची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मॅनेजमेंटमध्ये फुल टाइम शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या सूचना ज्या उमेदवारांनी जानेवारी 2019 च्या आधी आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे अशा उमेदवारांना या भरतीसाठी अप्लाय करता येणार नाही. या पदभरतीसाठी केवळ भारतीय नागरिकांनाच अप्लाय करता येणार आहे. पदभरतीसाठी तीस वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 35 वर्षांची वयोमर्यादा असणार आहे. PWD उमेदवारांसाठी 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवार कर याआधी कुठली अप्रेंटीशीप करत असतील तर अशा उमेदवारांना या भरतीसाठी अप्लाय करता येणार नाही. उमेदवारांनी यासाठी आपला सुरु असलेला ई-मेल आयडी, मोबाईल नंबर देणं अनिवार्य आहे. अशा पद्धतीनं करा अप्लाय सुरुवातीला www.vvsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन उमेदवार या पदभरतीसाठी अप्लाय करू शकतात. यासाठी पुढील कागदपत्रं असणं आवश्यक. शैक्षणिक प्रमाणपत्र नॉन-किमीलेअर प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र हे वाचा - End Of Work From Home: भारतातील या मोठ्या कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम अर्ज करण्याची शेवटची तारीख - 08 ऑक्टोबर 2021
    JOB ALERT ISRO Engineering Apprentice Recruitment
    या पदांसाठी भरती  इंजिनिअरिंग अप्रेन्टिस (Engineering Apprentice) मॅनेजमेंट अप्रेन्टिस (Management Apprentice)
    शैक्षणिक पात्रता  इंजिनिअरिंगच्या ब्रांचमध्ये 65% किंवा 6.84 CGPA इतके मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे. 60% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट
    अशा पद्धतीनं करा अप्लाय  सुरुवातीला www.vvsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन उमेदवार या पदभरतीसाठी अप्लाय करू शकतात. यासाठी पुढील कागदपत्रं असणं आवश्यक. शैक्षणिक प्रमाणपत्र नॉन-किमीलेअर प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र
    शेवटची तारीख   08 ऑक्टोबर 2021
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rmt.vssc.gov.in/GA2021/s.jsp  या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: