मराठी बातम्या /बातम्या /करिअर /End Of Work From Home: भारतातील 'या' मोठ्या कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम; बघा संपूर्ण लिस्ट

End Of Work From Home: भारतातील 'या' मोठ्या कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम; बघा संपूर्ण लिस्ट

नेक IT कंपन्यांनी आणि इतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद (List of companies ending work from home) करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेक IT कंपन्यांनी आणि इतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद (List of companies ending work from home) करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेक IT कंपन्यांनी आणि इतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद (List of companies ending work from home) करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 03 ऑक्टोबर: कोरोनामुळे दीड वर्षांपासून संपूर्ण जगात अनेक कंपन्यांचं वर्क फ्रॉम होम (Work from Home end) सुरु आहे. कर्मचारी आपल्या कुटुंबासह वेळ घालवत ऑफिसचं काम करताहेत. या वर्क फ्रॉम होम अनेक कंपन्यांना आर्थिक फायदाही झाला आहे. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांचे आकडेही मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. त्यामुळे अनेक IT कंपन्यांनी आणि इतर कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद (List of companies ending work from home) करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही कंपन्यांनी काही कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल्स (Hybrid models) आणेल आहेत. याच कंपन्यांची यादी जाणून घेऊया.

हे वाचा - Wipro NTH Recruitment: Wiproमध्ये फ्रेशर्ससाठी Off Campus ड्राईव्ह; 3.5 लाख पगार

TCS कंपनीनं सर्वात आधी वर्क फ्रॉम होम बंद (TCS work from home end date) करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 500,000 जास्त कर्मचारी असलेल्या या कंपनीनं तब्बल 70-80 टक्के कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 2022 च्या सुरुवातीपर्यंत हे कर्मचारी परत ऑफिसला येण्याची शक्यता आहे. तसंच यानंतर TCS नं 25-25 मॉडेलची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे. यानुसार 5% कर्मचारी घरून काम करतील आणि उर्वरित 2025 पासून पूर्णपणे घरून काम करतील.

विप्रो (Wipro WFH Ends)आणि इन्फोसिस (Infosys) सारख्या आयटी कंपन्यांनी ऑफिस प्लॅनबाबत आपला हेतू स्पष्ट केला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, विप्रोचे चेअरमन रिशाद प्रेमजी यांनी ट्वीट केलं आहे की फर्म आपल्या कार्यालयांमध्ये कोरोनाव्हायरस प्रोटोकॉल कसे लागू करत आहे. त्यामुळे या कंपन्याही वर्क फ्रॉम होम बंद करण्याच्या मार्गावर आहेत.

IT क्षेत्रातील दिग्गजांव्यतिरिक्त, कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra WFH), एचडीएफसी बँक (HDFC Bank), अॅक्सिस बँक आणि येस बँक या वित्तीय गटांनी त्याचं वर्क फ्रॉम होम संपूर्णपणे बंद करण्याचे संकेत दिले आहेत.

तसंच एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक सारख्या बँकांना इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात परत येण्यास सांगण्याचा विचार करत आहेत. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्याचा पर्याय त्यांच्यावरच सोडत आहेत.

हे वाचा - Microsoft Recruitment: फ्रेशर्ससाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीची मोठी सुवर्णसंधी

IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार 3 दिवस सुटी

काही कंपन्यांमध्ये IT कर्मचाऱ्यांना 4 दिवसच  काम करावं लागणार आणि 3 दिवस सुटी मिळू शकणार अशी चर्चा सुरु झाली आहे. भविष्यात कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासह घालवण्याची संधीही मिळावी आणि ऑफिसचं कामही करता यावं. तसंच कर्मचाऱ्यांचं जीवन अधिक सुखकर बनवावं यासाठी 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी (4 days work culture in IT sector) असा निणर्णय अनेक कंपन्या घेण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Work from home