Home /News /career /

UP Board Result 2020: वडील चालवायचे इलेक्ट्रीकचं दुकानं 16 तास अभ्यास करून मुलानं केलं बोर्डात टॉप

UP Board Result 2020: वडील चालवायचे इलेक्ट्रीकचं दुकानं 16 तास अभ्यास करून मुलानं केलं बोर्डात टॉप

इंटरमीडिएट (12वी) मध्ये अनुरागला 97 टक्के मार्क मिळाले आहेत.

    बागपत, 27 जून : उत्तर प्रदेश बोर्डाचा नुकताच जाहीर झाला. यामध्ये इंटरमीडिएट परीक्षेत बागपत इथला अनुराग मालिकने केवळ आपल्या कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण गावाचंही नाव रोशन केलं आहे. बागपत येथील बरौतच्या श्री राम एस.एन. इंटर कॉलेजमधल्या अनुरागनं बोर्डात टॉपर होण्याचा मान पटकावला. अनुरागला पुढे IAS ची परीक्षा देऊन देशसेवा करायची असल्याचंही त्यानं न्यूज 18 सोबत बोलताना सांगितलं. इंटरचा टॉपर अनुराग मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. वडील प्रमोद मलिक यांचे विजेचे दुकान आहे. घरच्या परिस्थितीची जाणीव आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर त्यांनं आपलं ध्येय गाठल्याचं म्हटलं. मी दररोज 15 ते 16 तास अभ्यास करात होतो. परीक्षेच्या दिवसांत 17 ते 18 तास अभ्यास केला. ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मन लावून अभ्यास केल्यानंतर मिळालेल्या या यशाचा मला आनंद आहे असं अनुरागनं सांगितलं. अनुरागला IAS व्हायचं आहे यासाठी तो आता तयारी करणार असल्याचंही सांगितलं. हे वाचा-उधारी घेऊन केली UPSC ची तयारी, शेतकऱ्यांचा मुलगा झाला IAS इंटरमीडिएट (12वी) मध्ये अनुरागला 97 टक्के मार्क मिळाले आहेत. तर इयत्ता दहावीमध्ये रिया जैननं बोर्डात टॉप केलं असून तिला 96.67 टक्के मार्क मिळाले आहेत. यूपी बोर्डाचा दहावीचा निकाल या वर्षी 83.31 तर बारावीचा निकाल 74.83 टक्के लागला आहे. रिया आणि अनुराग दोघेही श्रीराम एसएम इंटर कॉलेजचे विद्यार्थी आहेत. मागील वर्षी इंटरमीडिएटमध्ये अव्वल स्थान मिळवणारी तनु तोमरही या शाळेची विद्यार्थीनी होती. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    पुढील बातम्या