जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / वडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी

वडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी

मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा मोहम्मद आता सरकारी अधिकारी बनलाय.

मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा मोहम्मद आता सरकारी अधिकारी बनलाय.

मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या तरूणानं युपीएसससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 29 मे :  ‘ज्यांच्या पंखात बळ असते, ते आकाशाची उंची गाठू शकतात’ या ओळी मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मोहम्मद हुसैन सय्यदला बरोबर लागू पडतात. गरिबीला आव्हान देत, संकटांना चीतपट करत मोहम्मदने UPSC परिक्षेत घवघवीत यश मिळवलं. मुंबईच्या वाडी बंदर परिसरातील सोलापूर स्ट्रीटवरील झोपडपट्टीत राहणाऱ्या या तरूणानं युपीएससी परीक्षेत 57o वा रॅंक मिळवून तरूणांसमोर एक आदर्श ठेवला आहे. कशी घेतली भरारी? हुसैनचे वडील रमजान इस्माईल सय्यद हे इंदिरा डॉकमध्ये लोडिंग आणि अनलोडिंग विभागात गोदी कामगार म्हणून काम करतात. मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा यासाठी हुसेनच्या वडिलांनी त्याला खंबीर साथ दिली.

News18लोकमत
News18लोकमत

बेताची आर्थिक परिस्थिती, जागेची कमतरता, घरात अभ्यासासाठी अनुकूल वातावरणाचा अभाव, नागरी सेवा परीक्षेबाबत अपुरी माहिती हे सर्व हुसैनपुढं आव्हान होते. त्यानं या आव्हानांवर मात करत वयाच्या 27 व्या वर्षी पाचव्या प्रयत्नात यश मिळवलं आहे. Success Story: याला म्हणतात जिद्द, जन्मत: अंध, आईचं निधन, पण सोहमने जिंकून दाखवलं, Video ‘मी वडिलांसोबत काही कामानिनित्त सरकारी कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी मी हे स्वप्न पहिल्यांदा पाहिलं. या प्रवासात माझ्या कुटुंबानं मला नेहमीच साथ दिली. माझे लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. यापूर्वी मिळालेल्या अपयशामुळे निराशा आली होती. पण, मी त्यामधून बाहेर पडलो. युपीएससी परीक्षा पास झालेला आमच्या भागातील मी कदाचित पहिलाच तरूण आहे. मला मिळलेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन, अशी भावना हुसैननं यावेळी बोलताना व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात