मुंबई, 24 मे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मंगळवारी नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं आहे. मात्र मध्य प्रदेशमध्ये यूपीएससीच्या निकालाबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. दोन महिला उमेदवार परीक्षेला बसल्या होत्या, एकाच रोल नंबरवर मुलाखती घेतल्या आणि आता दोघींनीही 184 वा क्रमांक मिळवला आहे असा दावा केला जात आहे. पण कोणाचा दावा खरा आहे हे समजू शकत नाहीये. दोघींच्याही घरी सेलिब्रेशन दणक्यात सुरु आहे. मंगळवारी UPSC परीक्षेचा निकाल आल्यानंतर आयशा नावाच्या मुलीला 184 वा क्रमांक मिळाला आहे. यानंतर दोन कुटुंबात सेलिब्रेशन सुरू झालं. एक कुटुंबदेवासचं आहे, ज्यामध्ये आयशा नजीरुद्दीन फातिमाचे यांना 184 वा क्रमांक मिळाला आहे. तर दुसरं कुटुंब अलीराजपूर जिल्ह्यातील आयेशा सलीमुद्दीन मक्राणीचे यांचं आहे,ज्यांनाही 184 वा क्रमांक मिळाला आहे. दोघांचा रोल नंबर एकच असल्याने चूक झाली आहे. गड्यांनो, गौतमी पाटीलशी लग्न करायचा विचार करताय की काय? मग तिचं शिक्षण बघायला नको? तिनंच दिली माहिती विशेष म्हणजे दोघींच्याही प्रवेशपत्रात रोल नंबर एकच आहे. मात्र दोघींनाही एकच रोल नंबर देणं आणि मुलाखतीपर्यंत प्रकरण जाणं हे पचनी न पडणारं आहे. मात्र, या दोघांनी परीक्षा दिल्याचा दावा, मुलाखत दिल्याचा पुरावाही दोघांकडून केला जात आहे. त्यामुळे कोणीतरी एक खोटं बोलत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. आयशा मकरानीचा भाऊ शाहबाजुद्दीन मकरानी (सिव्हिल इंजिनियर) अलीराजपूरचा दावा आहे की त्यांच्या बहिणीने खूप मेहनत केली होती. बहिणीने आयएएस व्हावे, असे आईचे स्वप्न होते. तिला 184 वा क्रमांक मिळाला आहे. याबाबत न्यायालयातही जाणार आहोत. दुसरीकडे, देवासच्या आयेशा फातिमाचे वडील नजीरुद्दीन यांनीही दावा केला आहे की, केवळ त्यांच्या मुलीची निवड करण्यात आली आहे. UPSC अशी चूक करू शकत नाही. मी रात्रीला दिवस मानेन, पण ते असे असणे स्वीकारू शकत नाही. बाबो! Google चा ‘हा’ कर्मचारी आहे बॉस सुंदर पिचाईंपेक्षाही श्रीमंत; हजारो कोटींमध्ये आहे नेटवर्थ हे प्रकरण तपासानंतर स्पष्ट होणार असले तरी दोन्ही कुटुंबे मात्र आनंदात मग्न आहेत. यूपीएससीसारख्या परीक्षेत एकच रोल नंबर देणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रोल नंबर बनावट निघण्याची शक्यता आहे. दरम्यान या दोघींचेही हॉल तिकिट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये आयेशा मक्राणीच्या प्रवेशपत्रावर व्यक्तिमत्व चाचणीची तारीख 25 एप्रिल आणि गुरुवार असा दिवस लिहिला होता. तर आयेशा फातिमाच्या कार्डवर व्यक्तिमत्व चाचणीची तारीख 25 एप्रिल असली तरी दिवस मंगळवार होता. प्रत्यक्षात 25 एप्रिल रोजी मंगळवार होता.
देवासच्या आयेशाच्या प्रवेशपत्रावर यूपीएससीचं वॉटर मार्क आहे. तर अलीराजपूरच्या आयशाचे प्रवेशपत्र साध्या कागदावर छापल्यासारखं दिसत आहे. तिसरे कारण म्हणजे देवासच्या आयेशाच्या अॅडमिट कार्डमध्ये QR कोड आहे, जो स्कॅनिंग केल्यावर अॅडमिट कार्डमध्ये लिहिलेली माहिती दाखवली जात आहे. अलीराजपूरच्या आयेशाच्या प्रवेशपत्रात क्यूआर कोड नाहीये. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार आहे. त्यामुळे या दोघींपैकी नक्की कोण खरं आणि कोण खोटं हे लवकरच समजणार आहे.