आपल्या आदाकारीने सोशल मिडियावर गौतमी पाटील देखील चांगलीच व्हायरल झाली. गौतमीच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. पण सोशल मीडिया स्टार असलेली गौतमी नक्की शिकली किती आहे? हे तर तुम्हालाही जाणून घेण्याची इच्छा असेलच. याबद्दल तिनं स्वतःच माहिती दिली आहे.
सोशल मीडियाने गौतमी पाटीला प्रसिद्धी मिळवून दिली. आपला डान्स आणि एक्प्रेशनने अनेक तरुणांना वेड लावणारी गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली ती तिच्या डान्स आणि कॉन्ट्रोवर्सीमुळे.
मात्र गौतमीबद्दलची खासगी माहिती अनेकांना माहिती नाही. News18 लोकलशी बोलताना गोतमीने तीच्या डान्स, शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे.
इतकी प्रसिद्धी मिळून देखील गौतमी संदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लोकांना माहिती नाहीत. त्या बद्दल स्वतः गौतमी पाटीलने News18 लोकलला माहिती दिली आहे.
गौतमीनं सांगितले की, मी मुळची धुळे जिल्ह्यातील आहे. माझं वय 27 आहे. माझं शिक्षण केवळ दहावी झालं आहे. धुळ्यातील सिंदखेडा या ठिकाणीच दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
गेली नऊ ते दहा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे. डान्ससाठी कुठे प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. इतरांचे पाहून मी डान्स करायला शिकले.