जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / फक्त 25 रुपये भरून लाखो रुपये पगार असणारे सरकारी अधिकारी होण्याची संधी; इथे लगेच करा अर्ज

फक्त 25 रुपये भरून लाखो रुपये पगार असणारे सरकारी अधिकारी होण्याची संधी; इथे लगेच करा अर्ज

सरकारी अधिकारी होण्याची संधी

सरकारी अधिकारी होण्याची संधी

जे इच्छुक उमेदवार या पदांवर नोकरी मिळवण्याचा विचार करत आहेत, त्यांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल:  केंद्रीय लोकसेवा आयोगानं (यूपीएससी) सुपरवायझर आणि इतर पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार यूपीएससीच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. यूपीएससी भरती 2023 साठी नोंदणी प्रक्रिया 22 एप्रिलपासून सुरू झाली असून आणि 12 मे 2023 रोजी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असेल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण नऊ रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. जे इच्छुक उमेदवार या पदांवर नोकरी मिळवण्याचा विचार करत आहेत, त्यांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

यूपीएससी भरती अंतर्गत भरल्या जाणार्‍या पदांची संख्या असिस्टंट सॉईल कंझर्व्हेशन ऑफिसर: 2 पदे अॅडिशनल असिस्टंट डायरेक्टर: 3 पदे शास्त्रज्ञ ‘बी’: 1 पद सुपरवायझर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन डिस्ट्रिक्ट: 3 पदे यूपीएससी भारतीसाठी पात्रता निकष: ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार संबंधित पात्रता आणि वयोमर्यादा असणं आवश्यक आहे. IAS Tips: UPSC परीक्षा म्हणजे प्रचंड टेन्शन; ऐनवेळी लहान चुका टाळण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी UPSC भरतीसाठी अर्ज फी इच्छुक उमेदवारांना अर्ज फी म्हणून 25 रुपये भरावे लागतील. फक्त रोखीनं किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयच्या नेट बँकिंग सुविधेद्वारे किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून केलेलं पेमेंट स्वीकारलं जाईल. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. क्या बात है! ‘या’ IT कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; दुप्पट होणार पगार; सर्वांना मिळेल सारखी सॅलरी यूपीएससी भरतीचे इतर तपशील मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये, ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांना 100 गुणांपैकी 50 गुण, ओबीसींना 45 गुण, एससी/एसटी/पीडब्ल्युबीडींना-40 गुण मिळवावे लागतील. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, इच्छुक उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे कर्दनकाळ; सोडली होती परदेशी बँकेतील नोकरी; या दबंग IPS ची सर्वत्र चर्चा सध्याच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं फार कठीण ठरत आहे. शिवाय, आर्थिकदृष्ट्या सरकारी नोकरीचं महत्त्वही वाढत आहे. केंद्र सरकारी नोकरी किंवा बँकेत नोकरी मिळवायला लेखी परीक्षा द्यावी लागते, मुलाखत होते त्यानंतर अनेक उमेदवारांमधून निवड होते. अशा परिस्थितीमध्ये यूपीएससीनं काढलेली कर्मचारी भरतीची अधिसूचना तरुणांसाठी दिलासादायक ठरत आहे. कारण या पदांसाठी कठीण परीक्षा न देता केवळ मुलाखतीच्या आधारे निवड होणार आहे. देशातील प्रशासकीय पदांवर होतकरू आणि योग्य उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी यूपीएससी भरती प्रक्रिया राबवत असते. आताही यूपीएससी एकूण नऊ रिक्त जागा भरणार आहे. या संधीचा फायदा घेऊन इच्छुक उमेदवार आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात