मुंबई, 31 मे: काही दिवसांपूर्वी UPSC CSE 2022 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. ज्या निकालांतर्गत भारतीय नागरी सेवा पदांसाठी एकूण 933 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. हे सर्वच देशाच्या निरनिराळ्या भागांमधील उमेदवार आहेत. त्यांना बघून किंवा प्रेरणा घेऊन इतर हजारो विद्यार्थी UPSC ची तयारी करत असतात. पण अनेक उमेदवारांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असतो की, किती रँकवर त्यांना आयएएस, आयपीएस किंवा आयएफएस पद मिळू शकतं. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल माहिती सांगणार आहोत. UPSC द्वारे IAS, IPS, IFS च्या पदांसाठी कोणतीही पूर्व-निर्धारित रँक नाही. उलट हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जसं एकूण किती पदं आहेत, किती उमेदवार आहेत, किती कट ऑफ आहे आणि कोणत्या पदासाठी किती उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरले आहेत. मात्र या पदांसाठी मागील वर्षांच्या रँकच्या आधारे कोणत्या रँकवर पोहोचल्यावर कोणते पद मिळू शकतं याचा अंदाज लावता येतो. PCMC Recruitment: महापालिकेत नोकरीसाठी ना परीक्षा ना टेस्ट; थेट मिळेल जॉब; या दिवशी मुलाखत 2021 च्या रँकनुसार पोस्ट 2021 च्या UPSC परीक्षेत, IAS पदासाठी सर्वसाधारण श्रेणीचा शेवटचा क्रमांक 77 होता. म्हणजेच, 77 पर्यंत रँक आणलेल्या सामान्य श्रेणीतील उमेदवाराची IAS पदासाठी निवड झाली. त्याचप्रमाणे, EWS साठी शेवटचा क्रमांक 320, OBC साठी 338, SC साठी 502 आणि ST साठी 547 होता. IFS पदासाठी जनरलची शेवटची रँक 88, EWS 369, OBC 398, SC 517 आणि ST 600 होती. तर IPS पदासाठी, सर्वसाधारण श्रेणीची शेवटची श्रेणी 229, EWS साठी 513, OBC साठी 489, SC साठी 601 आणि ST साठी 657 होती. महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार अन् पात्रता फक्त 7वी-10वी; राज्याच्या या विभागात सरकारी नोकरी; करा अप्लाय
यूपीएससी सिव्हिल सेवा 2021 | लास्ट रँक(General) | लास्ट रँक (EWS) | लास्ट रँक OBC | लास्ट रँक SC | लास्ट रँक ST |
---|---|---|---|---|---|
IAS | 77 | 320 | 338 | 502 | 547 |
IFS | 88 | 369 | 398 | 517 | 600 |
IPS | 229 | 513 | 489 | 601 | 657 |
मात्र 2021 मध्ये केवळ 685 उमेदवार निवडले गेले. यंदा उमेदवार आणि पदांची संख्या जास्त आहे, त्यामुळे शेवटचा क्रमांक जास्त असू शकतो.