मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

इंग्रजी बोलायला घाबरणारे अभिषेक शर्मा बनले IAS ऑफिसर; कठोर मेहनतीने गाठलं ध्येय

इंग्रजी बोलायला घाबरणारे अभिषेक शर्मा बनले IAS ऑफिसर; कठोर मेहनतीने गाठलं ध्येय

अभिषेक शर्मा यांनी दोन वेळा UPSCची परीक्षा दिली.

अभिषेक शर्मा यांनी दोन वेळा UPSCची परीक्षा दिली.

अभिषेक शर्मा (IAS Abhishek Sharma) आपल्या आईच्या ऑफिसमध्ये जायचे तेव्हा तिथल्या ऑफिसरला (Officer) पाहून त्यांनाही आपण ऑफिसर व्हावं असं वाटायचं.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 25 जून: UPSC परीक्षेमध्ये 69 रँक मिळवणारे अभिषेक शर्मा (IAS Abhishek Sharma)  जम्मू-काश्मीरचे आहेत. त्यांची आई डीसीएम ऑफिसमध्ये क्लार्क आहे. आईला भेटण्यासाठी ते ऑफिसमध्ये जायचे आणि त्यावेळेस तिथल्या ऑफिसरला पहायचे. तेव्हापासूनच त्यांच्या मनामध्ये UPSCची परीक्षा देण्याचा विचार होता. मात्र मनात्या इंग्रजीच्या भीतीने UPSC परीक्षा देण्यासाठी अभिषेक शर्मा यांना टेन्शन यायचं. 2014 पासून ते यूपीएससी परीक्षेची तयारी करत होते. अभिषेक शर्मा यांनी दोन वेळा UPSCची परीक्षा दिली दोन वेळा अपयश आल्यानंतर त्यांनी आपली भाषा सुधारण्याचा  निर्णय घेतला आणि तिसऱ्या प्रयत्नांमध्ये यश मिळवलं. (मुलांच्या निकोप वाढीसाठी करू नका ‘या’ चुका, पालकांनी बदला चुकीच्या सवयी) यासाठी अभिषेक शर्मा यांनी दिल्लीमध्ये 3 महिने तयारी केली त्यांनी 2017 मध्ये UPSCची सिविल सर्विस (civil Service) परीक्षेमध्ये 69 रँक मिळवत IAS ऑफिसर होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. अभिषेक शर्मा शाळेपासूनच हुशार होते. त्यांना दहावी मध्ये 90 टक्के मिळाले होते. ('आई माझ्या बाबांशी लग्न करशील का?', कधीच पाहिला नसेल असा प्रपोजचा CUTE VIDEO) अभिषेक शर्मा यांनी UPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ते सांगतात ‘अभ्यास करतानाच नोट्स बनवल्या तर, सहजपणे परीक्षा पास होता येतं UPSCची परीक्षा अभ्यासक्रम फार मोठा असल्यामुळे सगळा अभ्यास करणं शक्य होत नाही. अशा वेळेस नोट्स तयार केल्या तर, रिविजन करतान फायदा होतो’. (इंजेक्शनच्या भीतीने पळत सुटले आजोबा; मग नर्सने काय केलं ते तुम्हीच पाहा VIDEO) अभिषेक शर्मा सांगतात, ‘तुम्ही कुठल्याही मिडीयम मधले असले तरी देखील UPSCच्या परीक्षेमध्ये मेहनतीने यशस्वी होऊ शकता. इंग्रजी भाषा UPSC परीक्षेमध्ये अडथळा ठरू शकत नाही. जी भाषा येते त्या भाषेमध्ये आपण उत्तर देऊ शकतो.पण मेहनतीला मात्र पर्याय नाही’.
First published:

Tags: Inspiration, Inspiring story, Success stories, Success story, Upsc

पुढील बातम्या