'आई माझ्या बाबांशी लग्न करशील का?', कधीच पाहिला नसेल असा प्रपोजचा CUTE VIDEO

प्रपोजचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही सो क्युट म्हणाल.

प्रपोजचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही सो क्युट म्हणाल.

  • Share this:
    मुंबई, 23 जून : प्रपोज करण्याचे तसे बरेच मार्ग आहेत. कुणी हार्ट सिम्बॉल देऊन, कुणी गुलाब देऊन, कुणी अंगठी देऊन, कुणी एखाद्या रोमँटिक ठिकाणी नेऊन प्रपोज करतं. पण सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रपोजचा (Proposal Video) असा व्हिडीओ व्हायरल  (Viral Video) होतो आहे, जो तुम्ही कधीच पाहिला नसेल. प्रपोज करण्याचं ठिकाण आणि पद्धत दोन्हीही हटके आहे. व्हिडीओत पाहू शकता एक महिला पाळण्याजवळ उभी आहे. ती बाळाच्या अंगावरील कपडे बाजूला करताना दिसते आहे. तिच्यासमोर एक पुरुष उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकताही दिसते आहे. महिला जेव्हा बाळाला पाहते तेव्हा थक्कच होते. तिला रडूच कोसळतं. त्यानंतर तिच्यासमोरील तरुण गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करताना दिसतो.
    त्यानंतर कॅमेरा बाळाजवळ जातो, तिथं पाहू शकता की बाळाला जे कपडे घालण्यात आले आहेत. त्यावर म्हटलं आहे की, आई तू माझ्या बाबांशी लग्न करशील का? हे वाचा - लग्नाआधी हसतहसत नवरा-नवरीने केलं एकमेकांचं मुंडण; कारण ऐकून आवणार नाही अश्रू असं प्रपोज पाहून महिला भावुक होते. ती आपल्या बॉयफ्रेंडला मिठीच मारते आणि लगेच होकारही देते. आपल्या आई-बाबाला असं एकत्र पाहून बाळाच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव दिसून येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published: