जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / UPSC Time Table: 2024 वर्षासाठीचं UPSC चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; कधी येणार नोटिफिकेशन? बघा

UPSC Time Table: 2024 वर्षासाठीचं UPSC चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; कधी येणार नोटिफिकेशन? बघा

UPSC Time Table: 2024 वर्षासाठीचं UPSC चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर; कधी येणार नोटिफिकेशन? बघा

UPSC 2024: इच्छुक उमेदवार upsc.gov.in या यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 मे:  केंद्रीय नागरी सेवा आयोग अर्थात यूपीएससीने आपल्या 2024मधल्या बहुतांश रिक्रूटमेंटविषयक परीक्षांचं वार्षिक वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्या वेळापत्रकात नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षा आणि मेन्स परीक्षेच्या तारखांचाही समावेश असून, प्रीलिमचं नोटिफिकेशन आणि रजिस्ट्रेशनच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवार upsc.gov.in या यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून संपूर्ण वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 26 मे 2024 रोजी होणार आहे. त्याचं नोटिफिकेशन 14 फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 मार्च 2024 ही असेल. प्रीलिम अर्थात पूर्वपरीक्षा, मेन्स अर्थात मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू अर्थात मुलाखत या तीन टप्प्यांत परीक्षा घेतली जाईल. प्रीलिममध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांना मेन्स परीक्षेला बसता येईल. ती परीक्षा 20 सप्टेंबर रोजी होईल. त्यानंतर इंटरव्ह्यूचा टप्पा होईल. त्याच्या तारखा मेन्स परीक्षेच्या रिझल्टनंतर जाहीर होतील. SSC CHSL Recruitment: 12वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1600 जागांसाठी भरतीची घोषणा; लगेच करा अप्लाय भारतीय प्रशासकीय यंत्रणेमधले अधिकारी निवडले जात असल्याने सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ही खूप प्रतिष्ठेची परीक्षा असते. यूपीएससीच्या परीक्षांच्या वार्षिक वेळापत्रकामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस एक्झाम, एनडीए, सीडीएस, इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस एक्झाम, CISF AC (EXE), LDCE-2023 अशा विविध परीक्षांच्या वेळापत्रकांचा समावेश आहे. IPS Success Story: 15 महिन्यांत तब्बल 16 दहशतवाद्यांना ठोकलं; AK-47 घेऊन आसामच्या जंगलात फिरतात या दबंग IPS संरक्षण दलांमध्ये भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या NDA/NA आणि CDS या परीक्षांची अधिसूचना यूपीएससीकडून 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, 9 जानेवारी 2024पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. NDA/NA/CDS (I) परीक्षा 21 एप्रिल 2024 रोजी घेतल्या जाणार असून, NDA/NA/CDS (II) परीक्षा 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. IPS Success Story: 12वी झाले नापास, वेळप्रसंगी रस्त्यावरही झोपले अन् झाले सिंघम; दबंग ऑफिसरची कहाणी दरम्यान, यूपीएससीने अलीकडेच या वर्षीच्या प्रीलिम परीक्षेची ई-अ‍ॅडमिट कार्ड्स उपलब्ध केली आहेत. ही प्रीलिम 28 मे रोजी होणार आहे. 2023च्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनसाठी नावनोंदणी केलेल्यांनी अ‍ॅडमिट कार्ड्स डाउनलोड करणं गरजेचं असून, ते परीक्षेच्या दिवशी सोबत आणणं बंधनकारक आहे. या परीक्षेचे अंतिम रिझल्ट्स जाहीर होईपर्यंत हे अ‍ॅडमिट कार्ड व्यवस्थित जपून ठेवणं गरजेचं असल्याचंही यूपीएससीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात