Home /News /career /

मोठी बातमी! आठवड्यातून अवघे 4.5 दिवस काम; इतर दिवस सुट्या; 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी! आठवड्यातून अवघे 4.5 दिवस काम; इतर दिवस सुट्या; 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं हा मोठा निर्णय UAE कडून घेण्यात आला आहे

कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं हा मोठा निर्णय UAE कडून घेण्यात आला आहे

अवघे 4.5 दिवस काम (4.5 days working in UAE now) करावं लागणार आहे तर शनिवार-रविवार weekend असणार आहे

    दुबई, 07 डिसेंबर: कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आता चार दिवसांचा आठवडा (4 day week for employees) असणार आणि इतर दिवस सुट्या असणार याबाबतीत आपण ऐकत आलो किंवा बघत आलो आहोत. कर्मचाऱ्यांचा कामातील परफॉर्मन्स अजून चांगला व्हावा किंवा त्यांना काम करण्यात उत्साह राहावा म्हणून काही कंपन्या हा निर्णय घेऊ शकतात अशीहे माहिती मिळाली होती. मात्र आता हे प्रत्यक्षात झालंय. युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजेच UAE मध्ये आता कर्मचाऱ्यांना अवघे 4.5 दिवस काम (4.5 days working in UAE now) करावं लागणार आहे तर शनिवार-रविवार weekend असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं हा मोठा निर्णय (UAE decision about working week days) या देशाकडून घेण्यात आला आहे. 1 जानेवारीपासून सरकारी संस्थांसाठी "नॅशनल वर्किंग वीक" (National Working Week)अनिवार्य आहे आणि मुस्लिम प्रार्थनेसाठी शुक्रवारी पूर्ण दिवस सुट्टीचा प्रादेशिक नियम आहे. त्यामुळे आठवड्यात अवघे 4.5 दिवस काम करून पुढचे तीन दिवस कर्मचाऱ्यांना OFF मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं UAE गव्हर्नमेंट ऑफिशिअल्सनी (National Working Week in UAE) सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्याचे चार दिवस पूर्ण काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना शुक्रवारी दुपारपर्यंतच काम करावं लागणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांची सुटी ही शुक्रवारी दुपारपासून तर रविवार रात्रीपर्यंत असणार आहे. मशिदीमध्ये प्रार्थना करण्यासाठीची वेळ दुपारी 1:15 मिनिटांनी ठेवण्यात आली आहे. 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी; एकाच वेळी 40,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन "हा जगभरातील सर्वात लहान वर्किंग वीक असणार आहे. या निर्णयामुळे UAE ला संपूर्ण जगभरातील मार्केटसोबत जोडण्यास मदत मिळणार आहे" असं स्टेटच्या नवीन एजन्सी WAM यांनी म्हंटलं आहे. UAE ने 2006 पर्यंत गुरुवार-शुक्रवार शनिवार व रविवार पाळले, जेव्हा ते खाजगी क्षेत्रासोबत शुक्रवार आणि शनिवार वर गेले. मात्र आता हे सर्व बंद करत थेट साडे चार दिवसांचा आठवडा करत UAE नं संपूर्ण जगाला संदेश दिला आहे. UAE मध्ये अनेक भारतीय कर्मचारी UAE मध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांनाही या नॅशनल वर्किंग वीकचा (What is National Working Week in UAE) लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन दिवस सुटी कर्मचाऱ्यांना अधिक सोयीची असणार आहे. अनेकांनी मानले आभार UAE नं हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर आता सोशल मीडियावरून UAE मध्ये राहणारे अनेक कर्मचारी आभार मानत आहेत. आम्हाला काम करण्यास अधिक उत्साह राहील, तसंच कुटुंबासह वेळही घालवता येईल असं काही कर्मचाऱ्यांचं मत आहे. ऑफिसपेक्षा WFH दरम्यान कर्मचाऱ्यांचा कसा होता परफॉर्मन्स? Gartner सर्व्हे बघाच भारतातही लागू होऊ शकतो नियम? चार दिवसांच्या आठवड्याची चर्चा भारतात (4 days working policy in India) अनेक महिन्यांपासून सुरु आहे. मात्र भारतातील काम करण्याच्या पद्धती आणि कंपन्यांच्या कामकाजाची वेळ बघता हा नियम भारतात लागू होऊ शकतो की नाही याबाबत अनेकांना संभ्रम आहे. मात्र हा नियम भारतात लागू झाला तर कर्मचाऱ्यांना थोडं एक्सट्रा काम करावं लागणार हे मात्र नक्की.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Dubai, UAE, Worker

    पुढील बातम्या