मराठी बातम्या /बातम्या /करिअर /ऑफिसपेक्षा WFH दरम्यान भारतीय कर्मचाऱ्यांचा कसा होता परफॉर्मन्स? Gartner सर्व्हेचा निष्कर्ष एकदा बघाच

ऑफिसपेक्षा WFH दरम्यान भारतीय कर्मचाऱ्यांचा कसा होता परफॉर्मन्स? Gartner सर्व्हेचा निष्कर्ष एकदा बघाच

 हा बदल झाल्याचं एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

हा बदल झाल्याचं एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

आता भारतीय कर्मचाऱ्यांच्या वर्क फ्रॉम होमबाबत (End of work from home) एक सर्व्हे समोर आला आहे.

मुंबई, 06 डिसेंबर: कोरोनातील लॉकडाऊनमुळे अनेकांना आपले जॉबही गमवावे लागले आहेत. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) दिलं आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याची चिन्हं दिसत आहेत. देशासह जगभरातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती त्यामुळे भारतातील कंपन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलावण्याची (back to Office after corona) योजना आखत आहेत. त्यात आता भारतीय कर्मचाऱ्यांच्या वर्क फ्रॉम होमबाबत (End of work from home) एक सर्व्हे समोर आला आहे.

वर्क फ्रॉम होम (Survey about WFH) करताना भारतीय अधिक चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो असं गार्टनरच्या नवीन सर्वेक्षणातून (survey by Gartner) समोर आलं आहे. हे निष्कर्ष अशा वेळी आले आहेत जेव्हा भारतीय कंपन्या कर्मचार्‍यांना कार्यालयात परत येण्यास सांगत आहेत कारण ते मार्च-एप्रिलपर्यंत पूर्णपणे पुन्हा उघडण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम (WFH is more Productive) पाहिजे असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

Google नं WFH बाबत घेतला मोठा निर्णय; अनिश्चित काळासाठी WFO केलं Postponed

२०२० मध्ये जागतिक महामारी सुरू झाल्यापासून भारतीय कामगारांच्या तंत्रज्ञानाच्या वापराला वेग आला आहे. "सुधारलेली डिजिटल निपुणता, रिअल-टाइम मोबाईल मेसेजिंग वापरण्याची इच्छा आणि व्हर्च्युअल मीटिंग सोल्यूशन्स, शेड्यूल केलेल्या लवचिकतेसह, कर्मचार्‍यांना घरून काम करताना त्यांच्या एकूण प्रॉडक्टिव्हिटीमध्ये वाढीचा अनुभव आला आहे" असं गार्टनरच्या प्रमुख संशोधन विश्लेषक रश्मी कोटिपल्ली यांनी म्हंटलं आहे.

भारतीय कामगारांची वाढलेली उत्पादकता ही UK, फ्रान्स (France) आणि जर्मनीमधील (Germany) कामगारांच्या विरूद्ध आहे, जिथे 40 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की त्यांची उत्पादकता WFH कार्यकाळात सारखीच राहिली. दरम्यान, सुमारे 30 टक्के ऑस्ट्रेलियन (Australia) कामगारांनी सांगितलं की, घरून काम करताना त्यांची उत्पादकता लक्षणीय वाढली आहे.

मात्र भारतीय कामगारांनी रिमोट काम करण्याला प्राधान्य दिले असताना, अनेक बिझिनेस लीडर्स त्वरीत त्याच्या कमतरता दर्शवतात, विशेषत: तरुण कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम चांगलं नाही असं सांगतात. मात्र कर्मचारी वेगळाच विचार करताना दिसतात. गार्टनरच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मानव-केंद्रित हायब्रीड किंवा रिमोट कामकाजाच्या वातावरणात कामगारांचा थकवा 44 टक्क्यांनी कमी झाला आहे आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी 28 टक्क्यांनी वाढली आहे.

काय सांगता! 'या' IT कंपनीचे CEO दररोज 5 कर्मचाऱ्यांसोबत घालवतात वेळ; वाचा कारण

म्हणूनच गार्टनरच्या ‘टॉप इनसाइट्स फ्रॉम 2021 डिजिटल वर्कर एक्सपीरियन्स सर्व्हे (Gartner’s ‘Top Insights From the 2021 Digital Worker Experience Survey’)’ने असा अंदाज वर्तवला आहे की तब्बल 47 टक्के स्किल असणारे कामगार 2022 मध्येही वर्क फ्रॉम होमलाच पसंती देतील.

First published:

Tags: Career opportunities, Survey, Work from home, जॉब