मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी; एकाच वेळी तब्बल 40,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन आणि पगारवाढ

'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी; एकाच वेळी तब्बल 40,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन आणि पगारवाढ

नवीन वर्षात ही कंपनी तब्बल 40,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन (Promotion of employees) आणि पगारवाढ (Salary Hike of Employees) देऊ करणार आहे.

नवीन वर्षात ही कंपनी तब्बल 40,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन (Promotion of employees) आणि पगारवाढ (Salary Hike of Employees) देऊ करणार आहे.

नवीन वर्षात ही कंपनी तब्बल 40,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन (Promotion of employees) आणि पगारवाढ (Salary Hike of Employees) देऊ करणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 07 डिसेंबर: भारतात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र आता Omicron नावाच्या कोरोनाच्या व्हेरिएन्टनं (Omicron cases India) जगभरातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. मात्र असं आले तरी आता कंपन्या पुन्हा पूर्ववत सुरु होताहेत. कोरोनाकाळात काही कंपन्यांनी आपले कर्मचारी कमी केले होते. मात्र आता कंपन्यांमध्ये पुन्हा जॉब्स उपलब्ध (Job opportunities in India) होऊ लागले आहेत. अनेकांना यामुळे नोकरी मिळत आहे. मात्र आता एका IT कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षात ही कंपनी तब्बल 40,000 कर्मचाऱ्यांना प्रमोशन (Promotion of employees) आणि पगारवाढ (Salary Hike of Employees) देऊ करणार आहे.

नामांकित IT कंपनी Accenture नं अचानक हा निर्णय (Accenture salary hike decision) घेतला आहे. यामुळे कर्मचारी खुश झाले आहेत. जगभरात सुमारे 80,000 कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व कॅम्पसमध्ये अशा पदोन्नती आणि पगारवाढ मिळाली आहे. विशेष म्हणजे या अनपेक्षित पगारवाढी मिळालेल्या कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 50% कर्मचारी हे भारतातील आहेत. त्यामूळे एकीकडे पगार कमी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही जणू लॉटरीच आहे. Trak.in या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

"Work From Homeच बरं रे बाबा"; कर्मचाऱ्यांच्या मनात Omicron ची भीती

Accenture कंपनीनं नुकतीच घोषणा केली आहे की डिसेंबरपासून 80,000 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाईल आणि त्यांच्या पगारात वाढ केली जाईल. या पदोन्नतींपैकी विक्रमी 1,030 मॅनेजिंग डायरेक्टर पदावरआहेत आणि 143 सिनियर मॅनेजिंग डायरेक्स्टर म्हणून Accenture मध्ये कार्यरत आहेत.पगारवाढीची नेमकी रक्कम अद्याप समोर आलेली नाही तरी बर्‍याच काळानंतर, Accenture किंवा कोणत्याही IT फर्मने अशा मोठ्या प्रमाणात पगारवाढ आणि पदोन्नती जाहीर केल्या आहेत.

नोकरदारांना संधी! मुंबईसह या शहरांतील कंपन्या देतायेत मोठी पगारवाढ

आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक चांगला करियर मार्ग प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते आणि ते आमच्या क्लायंट, त्यांचे सहकारी, आमचे भागधारक, भागीदार आणि समुदाय यांच्यात होत असलेल्या प्रचंड फरकाची ओळख आहे." असं Accenture नं म्हंटलं आहे.

तब्बल 20,000 महिलांना मिळणार लाभ

Accenture द्वारे पदोन्नती दिलेल्या 80,000 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 50% किंवा 40,000 भारतातील आहेत. तसेच प्रमोशन मिळालेल्या 40,000 भारतीयांपैकी 50% म्हणजेच 20,000 महिला कर्मचारी आहेत."भारतात, महिलांनी सर्व पदोन्नतींमध्ये जवळजवळ 50% आणि व्यवस्थापकीय संचालक स्तरावर 30% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व केले." असे Accenture कंपनीनं म्हंटलं आहे.

First published:

Tags: Career opportunities, Promotions, Salary