नागपूर, 11 डिसेंबर : महाराष्ट्रातील प्रत्येक भागाला मोठी खाद्यसंस्कृती लाभली आहे. त्यात नागपुरचे तर्री पोहेसुद्धा प्रसिद्ध आहे. तुमच्यापैकी अनेकांनी याबाबत ऐकले असेल. यातच आता नागपुरच्या दोन इंजिनिअर तरुणांनी हाच तर्री पोह्याला ब्रँड बनवला आहे. तसेच दोघांनी यात मोठे यश मिळवले आहे. चाहूल बालपांडे आणि पवन वाडीभस्मे अशी या दोन तरुणांची नावे आहेत. चाहूल बालपांडे हा सिव्हिल इंजिनिअर तर पवन वाडीभस्मे हा मेकॅनिकल इंजिनियर आहे. हे दोन्ही इंजिनिअर आता व्यावसायिक झाले होते. 2018 मध्ये त्यांनी दहा बाय दहाच्या छोट्याश्या दुकानातून छोट्याशा कढईतून पोह्याचा व्यवसाय सुरू केला. आता हा व्यवसाय भरभराटीस आली आहे. तसेच पोहेवाला डॉटकॉमच्या (व्यवसायाचा नाव) माध्यमातून नागपूरसह देशातील अनेक शहरात त्याचे आऊटलेट्स आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये नागपुरी तर्री पोहे, कांदा पोहे, सावजी पोहे, पनीर पोहे, इंदोरी पोहे, मिसळ पोहे, चिवडा पोहे, ऑरगॅनिक पोहे, असे पोह्याचे असे अनेक प्रकार पोहेवाला डॉटकॉमच्या आउटलेटवर तुम्हाला मिळतील. एक स्टार्टअप प्रोजेक्टला फंडिंग म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्या पोह्याच्या सर्व सातही आउटलेट्सवर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते आणि या माध्यमातून तब्बल 13 लाख प्लेट पोहे विकत आहेत. दोघांनी पोह्याचा व्यवसायाच्या संदर्भात काही संशोधन केले आणि स्वतःचे खास मसाले तयार केले आणि खास नागपुरी तरी पोह्याची झणझणीत चव कायम ठेवत त्यातील मसाले शरीराला अपायकारक ठरणार नाहीत, अशा पद्धतीच्या रेसिपीज तयार केल्या. नवीन ट्रेंड सुरू केला - दोन्ही इंजिनिअर तरुणांनी एक वेगळीच कल्पना शोधून काढली. जसे दिवसा पोह्याचा व्यवसाय चालतो त्याचप्रमाणे त्यांनी रात्रीसुद्धा उशिरापर्यंत पोहे विकण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आणि त्याच्या या गरमागरम पोहे विकण्याच्या प्रयोगाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. पोहे डॉट कॉमच्या माध्यमातून लवकरच दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरातही पोह्याचे आउटलेट्स उघडले जाणार आहे. हेही वाचा - 12 वी पास तरुणाची कमाल, भाजीपाला विकून झाला करोडपती, दिवसाला विकतो 90 हजारांचा माल पोहे डॉट कॉमची निर्मिती कशी झाली - चाहूल बालपांडे आणि पवन वाडीभस्मे यांचे शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करायचे, असा प्रश्न पडला होता. त्यामुळे त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मोठा स्टार्ट अप सुरू करावा, असे ठरविले. मात्र, या दोन्ही तरुणांसाठी त्यांच्याकडे सुरुवातीचा भांडवल नव्हता. म्हणून दोघांनी निधी उभारण्यासाठी पोह्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र, त्यांच्या या व्यवसायाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता दोघांनी या पोह्याचा व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. तसेच या व्यवसायला देशपातळीवर पोहोचवण्याचे ठरविले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.