मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Top Schools in MH: पालकांनो मुलांसाठी पुण्यात CBSE शाळा शोधताय? 'या' आहेत टॉप 5 CBSE Schools

Top Schools in MH: पालकांनो मुलांसाठी पुण्यात CBSE शाळा शोधताय? 'या' आहेत टॉप 5 CBSE Schools

पुणे शहरातील टॉप 5 CBSE शाळा

पुणे शहरातील टॉप 5 CBSE शाळा

आज आम्ही तुम्हाला पुणे शहरातील टॉप 5 CBSE शाळा (Top 5 CBSE schools in Pune List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal
पुणे, 16 मार्च: फेब्रुवारी आणि मार्च महिना असल्यामुळे सध्या सर्व शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांचा घरात परीक्षेचे (School exams) वारे वाहू लागले आहेत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पाल्यांनी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश (Admissions in best schools) घ्यावा किंवा चांगल्या शाळेत असतील तर पाल्यांनी उत्त्तरोत्तर प्रगती करावी अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्यात आता परिक्षानंतर पहिली आणि पाचवीच्या प्रवेशांचं (School admissions 2022) सत्र सुरु होणार आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत (Best schools in Maharashtra) प्रवेश मिळावा पालकांमध्ये अक्षरशः शर्यत लागली असते. RTE च्या अंतर्गत प्रवेश (How to get RTE Admissions) मिळवण्यासाठी कित्येक पालक तासंतास शाळांसमोर रांगेत उभे असतात. पण आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं अशी तुमचीही इच्छा असेल आणि तुम्ही चांगल्या शाळांच्या शोधात (How to get Admission in best school) असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला पुणे शहरातील टॉप 5 CBSE शाळा (Top 5 CBSE schools in Pune List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेण्यास (Best educational schools in Pune) मदत होईल. चला तर जाणून घेऊया संपूर्ण लिस्ट (List of best CBSE schools in Pune). 1. एअर फोर्स स्कुल पुणे शहरातील वायुसेना CBSE शाळा ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित शाळांपैकी एक आहे. ही शाळा IAF शैक्षणिक आणि सांस्कृतिक सोसायटीमध्ये नोंदणीकृत आहे. या शाळेत  L.K.G पासून 12वे पर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. ही शाळा CBSE बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत येते. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सोयी आणि इतर सुविधाही आहेत. शाळेत मोठी लायब्ररी आणि कम्प्युटर लॅब्स आहेत. तसंच शाळेतील शिक्षकांचा स्टाफही अनुभवी आणि उत्तम आहे. एअर फोर्स स्कुल
एअर फोर्स स्कुल
एअर फोर्स स्कुलमाहिती
शाळेचा पत्ताएअर फोर्स कॅम्पस, विमान नगर, पुणे – 411032
शाळेचा फोन क्रमांक+91-20-26633451
शाळेचा ई-मेल आयडीprincipalafsvn@gmail.com
वेबसाईट airforceschoolpune.ac.in

Top Schools in MH: पालकांनो, मुलांसाठी ठाण्यात शाळा शोधताय? 'या' आहेत टॉप 5 शाळा

2.  आर्मी पब्लिक स्कुल आर्मी पब्लिक स्कूलची स्थापना जून 1988 मध्ये संरक्षण जवानांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी करण्यात आली. ही शाळा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करते आणि त्यांना निकालाची चिंता न करता अडथळे पार पाडण्यास मदत करते. शाळा CBSE बोर्डांतर्गत येते. पहिली ते बारावीपर्यंतच शिक्षण या शाळेत देण्यात येतं. विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा इथे पुरवल्या जातात. विशेष म्हणे या शाळेत एक कांउन्सिलर आहे जे विद्यार्थ्यांना त्यांची प्रगत ओळखण्यात मदत करतात. आर्मी पब्लिक स्कुल
आर्मी पब्लिक स्कुल
आर्मी पब्लिक स्कुलमाहिती
शाळेचा पत्तासदर्न कमांड, रेसकोर्स जवळ पुणे – 411001
शाळेचा फोन क्रमांक+ 91 – 20 -26362765
शाळेचा ई-मेल आयडीapspune@rediffmail.com
वेबसाईट   www.apspune.com
3. पुणे इंटरनॅशनल स्कुल या शाळेचे उद्दिष्ट एक शांततापूर्ण आणि उत्तेजक वातावरण प्रदान करणे आहे जेथे विद्यार्थी त्यांच्या पूर्ण क्षमतेने कामगिरी करू शकतील.या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाठवलेला अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. नृत्य, कला आणि नाट्य हे शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग आहेत. शाळेमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय केली जाते. या शाळेत मोठे क्रीडांगण व सभागृह आहे. पुणे इंटरनॅशनल स्कुल
पुणे इंटरनॅशनल स्कुल
पुणे इंटरनॅशनल स्कुलमाहिती
शाळेचा पत्ताचिखली प्राधिकरण ते रावेत पुणे – 411026
शाळेचा फोन क्रमांक9370361897
शाळेचा ई-मेल आयडीpuneinternational@gmail.com
वेबसाईटpuneintschool.com
4. विखे पाटील मेमोरियल स्कूल विखे पाटील मेमोरियल स्कूल ही पुण्यातील सर्वात प्रसिद्ध शाळा आहे. हे पुण्यातील सेनापती बापट रोडच्या बाजूला पत्रकार नगर येथे आहे. या शाळेत CBSE बोर्डाचं शिक्षण देण्यात येतं. या शाळेत अनुभवी शिक्षकांपासून तर चांगल्या सोयी-सुविधांपर्यंत सर्व काही आहे. शाळेत स्विमिंग पूल आहे आणि विद्यार्थ्यांना स्विमिंग शिकावणारे शिक्षकही आहेत. मोठं ग्राउंड आणि स्पोर्ट्स अशा सर्वकाही सुविधा शाळेत आहेत. विखे पाटील मेमोरियल स्कूल
विखे पाटील मेमोरियल स्कूल
विखे पाटील मेमोरियल स्कूलमाहिती
शाळेचा पत्तापत्रकार नगर, सेनापती बापट रोडच्या बाहेर, पुणे – 411016
शाळेचा फोन क्रमांक[+91] 020 25658170
शाळेचा ई-मेल आयडीcontact@vpmspune.org
वेबसाईट  www.vpmspune.org
पालकांनो, मुलांच्या Admission चं टेन्शन विसरा; 'या' आहेत नागपुरातील टॉप 5 शाळा 5. कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल दर्जेदार शिक्षण देण्याच्या एकमेव दृष्टीकोनातून 2009 मध्ये स्थापित केंब्रिज इंटरनॅशनल हे ITCI द्वारे चालवले जाणारे एक विशेषज्ञ, बहु-स्थान, बहु-कार्यक्रम प्रशिक्षण केंद्र बनले आहे. शाळा विद्यार्थ्यांना समजून घेण्याचा आणि त्यांना आयुष्यभर शिकणारे असणे आवश्यक आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते. शाळेत शिक्षण मजेदार आणि मनोरंजक केले जाते. शाळेत CBSE आणि ICSE अशा दोन्ही बोर्डांकडून शिक्षण दिलं जातं. मोठी लायब्ररी, चांगले शिक्षक आणि मोठं ग्राउंड अशा सर्व चांगल्या गोष्टी या शाळेत आहेत. कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल
कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल
कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुलमाहिती
शाळेचा पत्तासीआयएस कॅम्पस, ब्लॉक III, टायटन शोरूमच्या मागे, मुंबई-पुणे महामार्ग, चिंचवड, पुणे 411 019
शाळेचा फोन क्रमांक+91 2032401819
शाळेचा ई-मेल आयडीinfo@cambridgeinternationalschool.in
वेबसाईटwww.cambridgeinternationalschool.in
महत्त्वाची सूचना - शिक्षण घेण्यासाठी कुठलीही शाळा कमी नाही. वरील सर्व शाळा या टॉप म्हणून आमच्यातर्फे निवडण्यात आलेल्या नाहीत. सदर शाळांची प्रसिद्धी आणि त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता या शाळांची लिस्ट देण्यात आली आहे.
First published:

Tags: Education, Maharashtra, Pune, Top news maharashtra, Top Schools in Maharashtra

पुढील बातम्या