मुंबई, 04 मे: आजकाल प्रत्येक क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे की माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात (Hard work) मग्न असतो. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी
(Success in Life) व्हायचे असते आणि या प्रयत्नात आपण रात्रंदिवस काम करत असतो. पण कधी कधी आपण आपल्या करिअरमध्ये
(Career Tips in Marathi) इतके गुंतून जातो की आपण स्वतःसाठी शांततेचे दोन क्षणही काढत नाही. त्यात कोरोनानंतर अनेक क्षेत्रांमध्ये स्पर्धा इतकी वाढली आहे की प्रत्येकजण स्वतःला सिद्ध करण्यासाठी खासगी आयुष्याकडे फारसं लक्ष देऊ शकत नाहीये. तुमच्या ऑफिसच्या कामांमध्ये अधिक गुंतल्यामुळे तुमचं खासगी आयुष्यावर फरक
(Affects on Personal Life due to office work) पडतोय असं तुम्हाला वाटतंय का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स
(Tips for work balanced between Professional & Personal Life) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या खासगी आणि प्रोफेशनल लाईफमध्ये बॅलन्स साधू शकता. चला तर मग जाणून घेऊया.
आपले प्राधान्यक्रम सेट करा
तुमचे काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी तुमचे प्राधान्यक्रम सेट करा. प्रथम तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम काय हवे आहेत ते समजून घ्या. आधी प्रायोरिटी सेट केल्यानंतर तुम्हाला आपोआप समजेल आढंगी कुठलं काम महत्त्वाचं आहे. त्यानुसार तुम्ही काम करू शकाल.
सुवर्णसंधी! क्रीडा विभागात तब्बल 1,00,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज
तुमचा वेळ ट्रॅक करा
तुमचं काम आणि खासगी आयुष्यामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी तुम्ही आठवडाभर तुमचा वेळ कसा घालवता याचा मागोवा घ्या. तुमच्यासाठी महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टी करण्यात तुम्ही किती वेळ घालवता? यावरून तुम्ही कामावर किती वेळ घालवता आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी किती वेळ देऊ शकता याची कल्पना येईल त्याप्रमाणे वागा.
ऑफिसचं टेन्शन ऑफिसमध्येच
तुमचं काम आणि खासगी आयुष्यामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी, तुमचे काम आणि तुमचे वैयक्तिक जीवन यांच्यात प्रायॉरिटीज ठरवा. तुम्ही ऑफिसची कामे घरी बसूनही करत आहात असं करू नका. ऑफिसचं टेन्शन, ऑफिसमध्येच सोडा.
तुमच्या खाजगी वेळेचा आदर करा
तुम्ही तुमच्या वैयक्तिक वेळेचा आदर करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही घरी असाल तर, आपत्कालीन परिस्थिती असल्याशिवाय ऑफिस कॉल्स अटेंड करू नका. जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला वेळ द्या.
Career Tips: SEO मध्ये करिअर करण्याची इच्छा आहे? मग हे स्किल्स आहेत ना? करा चेक
विश्रांती घेणं आवश्यक
कामासोबतच ब्रेकही खूप महत्त्वाचा आहे. काम करताना आपला मेंदूही थकतो आणि ताजेतवाने होण्यासाठी ब्रेकची खूप गरज असते. तुम्ही कामातून सुट्टीवर गेलात किंवा दुसरीकडे कुठेतरी गेलात किंवा तुमची आवडती एखादी गोष्ट केलीत तर बरे होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.