जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / पालकांनो, तुमचीही मुलं यंदा पहिल्यांदा शाळेत जाणार आहेत? मग 'या' खास टिप्स फक्त तुमच्यासाठी

पालकांनो, तुमचीही मुलं यंदा पहिल्यांदा शाळेत जाणार आहेत? मग 'या' खास टिप्स फक्त तुमच्यासाठी

शालेय दिवसांपासून मुलांना सकारात्मक गोष्टी सांगा

शालेय दिवसांपासून मुलांना सकारात्मक गोष्टी सांगा

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips for Parents for children schooling) देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मुलांना शाळेत पाठवण्यात अडचणी येणार नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल: कोरोनाकाळानंतर यावर्षी अनेक मुले प्रथमच शाळेत जाणार आहेत, त्यामुळे 2 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आता त्यांना शाळेत जाताना (school Reopening) संमिश्र भावना जाणवतील. नवीन परिस्थितीत स्वत:ला सेटल करणे मुलांना तसेच त्यांच्या पालकांनाही सोपे (Parenting Tips) जाणार नाही.यामुले पालकही चिंतेत आहेत. मुले शाळेत गेल्यानंतर इतर मुलांसबत जुळवून घेतील की नाही याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता चिंता करू नका. जर तुमचीही मुले यावर्षी पहिल्यांदा शाळेत (School parenting Tips) जाणार असतील तर हे बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips for Parents for children schooling) देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मुलांना शाळेत पाठवण्यात अडचणी येणार नाहीत. पालकांनी आपल्या मुलांना पहिल्यांदा शाळेत पाठवताना किंवा दीर्घ विश्रांतीनंतर खूप काळजी घ्यावी. मुलांना नवीन वातावरणाशी जुळवून घेणं सोपं नसतं आणि म्हणूनच तुम्हाला त्यांच्यासोबत खूप मेहनत करावी लागेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून बहुतांश शाळा सुरू झाल्या, मात्र मध्यंतरी लांबलेल्या वीकेंडमुळे अनेक मुलांचे वेळापत्रक पुन्हा विस्कळीत झाले. तुम्हालाही Gym ट्रेनर व्हायचंय? मग शिक्षणापासून पगारापर्यंत इथे मिळेल माहिती पहिला दिवस असेल तर.. जर तुमच्या मुलाची शाळा अजून उघडली नसेल किंवा तो अजून जॉईन झाला नसेल, तर वर्ग सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्याला शाळेत आणि वर्गात घेऊन या. यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी कमी त्रास होईल. शाळांबद्दल गोष्टी सांगा तुमच्या शालेय दिवसांपासून मुलांना सकारात्मक गोष्टी सांगा. यासोबतच शाळेबद्दल काही काल्पनिक कथाही त्याला सांगता येतील. यामुळे त्याला शाळेतील वातावरण समजण्यास मदत होईल. शालेय शिक्षणाशी परिचित व्हा मुलाला समजावून सांगा की शाळेत मुलांसाठी अनुकूल उपक्रमांचे विविध प्रकार आहेत. यामुळे तो शाळेत जाण्यास उत्सुक होईल आणि तेथे आपला दिवस चांगला घालवेल. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचंय? मग तुम्हाला ‘हे’ IMP स्किल्स येणं आवश्यक

जेवणाच्या डब्यात

शाळेत जाण्यापूर्वी तुमचे मूल रडायला लागले किंवा गप्प बसले, तर त्याच्या टिफिन बॉक्समध्ये एक चिठ्ठी ठेवा. त्यात तुम्ही स्मायली बनवू शकता किंवा मुलाला जे काही समजू शकते. यासह, तो तेथे तुमची उणीव भासणार नाही आणि त्याला तुमचा आधार वाटू शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात