मुंबई, 19 एप्रिल: गेल्या दोन वर्षांत जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारामुळे कार्यसंस्कृतीत बरेच बदल झाले आहेत. बहुतांश उद्योग हे वर्क फ्रॉम होम (Work from home) जॉब या पर्यायावर अवलंबून झाले आहेत आणि कर्मचाऱ्यांनाही त्याच पद्धतीने काम करण्याची सवय लागली आहे. आजकाल कौशल्यावर आधारित नोकऱ्यांची (Skills based jobs) मागणीही खूप वाढली आहे. निरनिराळया क्षेत्रात जॉब मिळवायचा (How to get job) असेल तर काही महत्त्वाचे स्किल्स येणं आवश्यक आहे. जर तुम्हाला घरी राहून 30-40 हजार रुपये कमवायचे असतील, तर तुम्ही कौशल्यावर आधारित नोकरीच्या पर्यायांद्वारे तुमच्या करिअरला एक नवीन मार्ग देऊ शकता. जर तुमच्याकडे डेस्कटॉप किंवा वैयक्तिक लॅपटॉप असेल, तर तुम्ही घराच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून या करिअर पर्यायांमध्ये भविष्य घडवण्याचा विचार करू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही स्किल्स (Important skills to get job in different fields) सांगणार आहोत जे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कामी येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया. तुम्हालाही स्वतःचा यशस्वी व्यवसाय सुरु करायचा आहे? मग ‘हे’ कोर्सेस करून बघाच डेटा एंट्री ऑपरेटर 10वी उत्तीर्ण लोकांसाठी डेटा एंट्री ऑपरेटरची नोकरी हा उत्तम करिअर पर्याय मानला जातो. हे काम घरात राहून करता येते. अनेक खाजगी कंपन्या डेटा एंट्री जॉब क्षेत्रात नोकऱ्यांसाठी रिक्त जागा भरतात. या नोकरीतून दरमहा 10 ते 15 हजार रुपये कमावता येतात. टायपिंगचे काम तुमचा टायपिंगचा वेग चांगला असेल आणि तुम्हाला त्यात रस असेल तर तुम्ही त्यात करिअर करू शकता. टायपिस्ट म्हणून तुम्ही दरमहा 15 ते 20 हजार रुपये कमवू शकता. यासाठीही दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. JEE Advanced 2022: विद्यार्थ्यांनो, कधी होणार परीक्षा आणि कसा करावा अर्ज; वाचा सोशल मीडिया व्यवस्थापक जर तुम्हाला सोशल मीडियाचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब इत्यादीवर पोस्ट शेअर करून घरी बसून 25-30 हजार रुपये कमवू शकता. अनेक ब्रँड आणि सेलिब्रिटी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हाताळण्यासाठी अशा लोकांना शोधत असतात. त्यासाठी हिंदी आणि इंग्रजीच्या ज्ञानासोबत सोशल मीडियाचा ट्रेंडही अपडेट करायला हवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.