• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • हमारा बजाज! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांसाठी पगार, कंपनीचा मोठा निर्णय

हमारा बजाज! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देणार 2 वर्षांसाठी पगार, कंपनीचा मोठा निर्णय

Covid-19 Crisis:कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्या कुटुंबाला ही कंपनी दोन वर्षापर्यंत पगार देत राहणार आहे. एवढेच नव्हे तर ते मृत व्यक्तीच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील करणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 मे: देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची (Corona Deaths in India) संख्या सध्या दोन लाखांच्या वर गेली आहे. दरम्यान हे संक्रमण रोखण्यासाठी (India Fight Against COVID-19) सरकारसह अनेक कंपन्या देखील मदत करत आहेत. यामध्ये  बजाज ऑटो (Bajaj Auto) ने देखील असा निर्णय घेतला आहे ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दोन वर्षासाठी त्यांच्या कंपनीकडून पगार दिला जाईल. शिवाय या मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील कंपनी उचलणार आहे. मेडिकल इन्शुरन्सचा कालावधी 5 वर्षांसाठी पुणेस्थित कंपनीच्या प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कंपनीने दिलेला वैद्यकीय विमा देखील पाच वर्षांसाठी वाढविण्यात येईल. बजाज ऑटोने देऊ केलेल्या इतर जीवन विम्याच्या फायद्यांपेक्षा हे फायदे जास्त आहेत. हे वाचा-'तेरा मुझसे है पहले का नाता..' म्हणत मुलानं आईला Video Call वर केलं अलविदा शिक्षणासाठी देणार 5 लाखांची मदत एका लिंक्डइन पोस्टमध्ये बजाजने असं म्हटलं आहे, 'सहाय्य धोरणाअंतर्गत 24 महिन्यांपर्यंत दरमहा मासिक वेतनाची भरपाई (2 लाख रुपयांपर्यंत), जास्तीत जास्त दोन मुलांसाठी बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रति मुल वर्षाकाठी 1 लाख रुपयांची मदत  आणि पदवीसाठी प्रत्येक वर्षासाठी 5 लाख रुपये शैक्षणिक मदत दिली जाईल.' गेल्या वर्षी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना देखील मदत बजाज ऑटोने हे देखील स्पष्ट केलं आहे की, हा मदत निधी 1 एप्रिल 2020 पासून आतापर्यंत या दरम्यान सर्व स्थायी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. अर्थात ज्यांचा मृत्यू गेल्यावर्षी झाला आहे अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देखील आर्थिक सहाय्य मिळणार आहे. बजाज ऑटोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की, आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना विविध उपाययोजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून सतत पाठिंबा देत राहू. ही मदत केवळ लसीकरण केंद्र यापुरती मर्यादित नाही तर कोविड केअर सर्व्हिस, अ‍ॅक्टिव्ह टेस्टिंग आणि हॉस्पिटलायझेशनसाठीही मदत केली जात आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: