जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / WFH संपलं पण ऑफिसमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही? टेन्शन नको; 'या' क्षेत्रांमध्ये घरूनच करता येईल काम

WFH संपलं पण ऑफिसमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही? टेन्शन नको; 'या' क्षेत्रांमध्ये घरूनच करता येईल काम

WFH संपलं पण ऑफिसमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही? टेन्शन नको; 'या' क्षेत्रांमध्ये घरूनच करता येईल काम

घरबसल्या आरामात काम करू इच्छित (How to get permanent work from home jobs) असाल, तर आज आम्ही तुम्हाला असे काही क्षेत्र सांगणार आहोत ज्यामध्ये नोकरी करताना तुम्हाला वर्क फ्रॉम होम मिळू शकेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वच लोकांचं वर्क फ्रॉम होम (Work from Home) सुरु होतं. मात्र आता कोरोना पूर्णपणे कमी झाल्यामुळे आता वर्क फ्रॉम ऑफिस सुरु झालं आहे. मात्र लोकांना वर्क फ्रॉम होमची सवय झाली आहे आणि आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे आता लोक अशा नोकऱ्या शोधत आहेत जिथे त्यांना ऑफिसला जाण्याचा त्रास होणार नाही. अशी अनेक फील्ड (Work from Home jobs) आहेत ज्यात घरून काम करणे नेहमीच शक्य आहे. तुम्हीही घरबसल्या आरामात काम करू इच्छित (How to get permanent work from home jobs) असाल, तर आज आम्ही तुम्हाला असे काही क्षेत्र सांगणार आहोत ज्यामध्ये नोकरी करताना तुम्हाला वर्क फ्रॉम होम मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया. Study Abroad: परदेशात शिक्षण घ्यायचंय आणि ते ही FREE? मग ‘हे’ देश बदलतील तुमचं नशीब; बघा संपूर्ण लिस्ट ऑनलाइन टिचिंग (Online Teaching) कोरोना महामारीच्या काळात एडटेक क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. अनेक ऑनलाइन ट्यूटोरियल प्लॅटफॉर्म प्रत्येक विषयासाठी शिक्षकांना दर तासाला चांगले पैसे देत आहेत. या क्षेत्रात अनेक ऑनलाइन फोरममध्ये सहभागी होऊन तुम्ही महिन्याला ३० हजार रुपये कमवू शकता. बिझिनेस डेव्हलपर (Business Developer) बिझिनेस डेव्हलपर कंपनीच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री वाढवण्यासाठी काम करतो. मार्केटिंग, व्यवसाय किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी एक चांगला पाया बनवेल. तुम्ही ऑनलाइन प्रमाणपत्र देखील घेऊ शकता. जर तुमच्याकडे या क्षेत्रातील कौशल्य आणि अनुभव असेल तर तुम्ही घरबसल्या चांगल्या कंपनीत जाऊन काम करू शकता. या क्षेत्रात सुरुवातीला 25 ते 30 हजार रुपये महिन्याला मिळू शकतात. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; BEL मुंबईत ‘या’ पदांसाठी भरती डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) डिजिटल मार्केटिंग व्यावसायिक ब्रँडसाठी मजबूत ऑनलाइन उपस्थिती तयार करण्यात मदत करतात. यामध्ये ते एसइओ, ईमेल मार्केटिंग, मोबाइल मार्केटिंगपासून सोशल मीडिया मार्केटिंगपर्यंत काम करतात. यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये पीजी सर्टिफिकेशन करू शकता. अनेक मोठ्या बिझनेस स्कूलमधून ऑनलाइन कोर्सेसही उपलब्ध आहेत. यामध्ये सुरुवातीला 20 ते 40 हजार रुपये मिळू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात