मुंबई, 23 ऑगस्ट: दरवर्षी हजारो विद्यार्थी बारावीनंतर परदेशी महाविद्यालयांमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी अर्ज करतात, परंतु त्यापैकी काहींनाच यश मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्ज योग्य पद्धतीने न भरणे. परदेशात शिक्षण घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. याद्वारे देश-विदेशात नोकऱ्या आणि करिअर निर्माण करणे सोपे असतानाच इतर देशांतील लोकांशी ताळमेळ साधून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्वही योग्य पद्धतीने विकसित होते. पण तुम्हाला माहित आहे का की असे अनेक देश आहेत जिथे शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. म्हणजेच तेथील लोकांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलते. तसेच काही देशांमध्ये तेथील लोकांना रोजगार नसेल तर सरकार रोजगार भत्ताही देते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्हाला फ्रीमध्ये शिक्षण मिळू शकेल. युरोपातील फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, डेन्मार्क आणि ग्रीस या देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. त्याचबरोबर मोरोक्को, इजिप्त, केनिया आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेंटिना आणि उरुग्वे हे देशही लोकांना मोफत शिक्षण देण्याच्या यादीत येतात. त्याचबरोबर मध्य अमेरिकेतील पनामा आणि आशियातील मलेशिया येथे मोफत शिक्षणाची तरतूद आहे. देशातील 13 National Law University मध्ये ओबीसींना शून्य आरक्षण, केंद्र सरकारने..
एवढंच नाही तर फिनलंडची शिक्षण व्यवस्था संपूर्ण जगात सर्वोत्तम मानली जाते. येथे प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण शिक्षण मोफत मिळते आणि कोणतीही व्यक्ती त्याला हवा तसा अभ्यास करू शकते. येथे कोणतीही शैक्षणिक संस्था, खाजगी किंवा सरकारी, लोकांकडून कोणतेही शुल्क आकारत नाही. एवढेच नाही तर विशेष म्हणजे ही सुविधा केवळ फिनलंडमधील नागरिकांसाठी नाही तर इतर देशांतील लोकांसाठीही येथे शिक्षण पूर्णपणे मोफत आहे.
हे देश शुल्कासह शिक्षणासाठी प्रसिद्ध USA म्हणजेच अमेरिका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका किंवा यूएसए हे सर्वसाधारणपणे परदेशातील अभ्यासाला जाण्याच्या यादीत अव्वल आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी USA हे आवडते ठिकाण आहे. आयव्ही लीग महाविद्यालये आणि हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, प्रिन्स्टन आणि एमआयटी सारखी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय प्रतिभा असणारी असल्यामुळे विद्यार्थी या देशाला पहिली पसंती देतात. यूएस हे निश्चितपणे परदेशातील अभ्यासासाठी सर्वात पसंतीचे ठिकाण आहे. अमेरिकेत व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यास, अभियांत्रिकी, गणित आणि संगणक विज्ञान, सामाजिकशास्त्रे, भौतिक आणि जीवन विज्ञान हे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी उत्तम कोर्सेस आहेत. कॅनडा भारतीयांसाठी परदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात आवडते अभ्यासाचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. शिक्षणाची गुणवत्ता, परवडणारी किंमत आणि सुरक्षित आणि बहुसांस्कृतिक वातावरण हे महत्त्वाचे घटक आहेत जे भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण केंद्र म्हणून कॅनडाच्या लोकप्रियतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. म्हणूनच भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यास, अभियांत्रिकी, गणित आणि संगणक विज्ञान, लाईफ सायन्स असे कोर्सेस उपयुक्त ठरतात. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; BEL मुंबईत ‘या’ पदांसाठी भरती
जर्मनी
दर्जेदार आणि परवडणार्या शिक्षणामुळे जर्मनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक पसंतीच्या देशांच्या यादीत सातत्याने वरच्या स्थानावर पोहोचले आहे. बहुसंख्य जर्मन विद्यापीठे नाममात्र फी घेतात किंवा कोणतेही शिक्षण शुल्क आकारत नाहीत. म्हणूनच जास्तीत जास्त विद्यार्थी या देशात शिक्षणाच्या मागे असतात. तसंच त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या पदव्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. म्हणूनच भारतीयांसाठी परदेशातील सर्वोत्तम देशांपैकी जर्मनी उत्तम आहे. जर्मनीत अभियांत्रिकी, व्यवसाय / व्यवस्थापन अभ्यास, कला/मानवता, गणित आणि संगणक विज्ञान आणि आर्टस् हे विद्यार्थ्यांचे आवडते कोर्सेस आहेत.