जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तरुणांनो, तयार राहा! देशातील 'या' टॉप ट्रेंडिंग क्षेत्रात पडणार नोकऱ्यांचा पाऊस; Resume सह राहा रेडी

तरुणांनो, तयार राहा! देशातील 'या' टॉप ट्रेंडिंग क्षेत्रात पडणार नोकऱ्यांचा पाऊस; Resume सह राहा रेडी

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे

सणासुदीच्या काळात (festive season) देशातल्या ई-कॉमर्स कंपन्या (e-commerce companies) मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी कामगारांची भरती करण्याच्या तयारीत आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 ऑगस्ट:  भारतात (India) कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत कित्येक तरुणांच्या नोकऱ्या (jobs) गेल्या आहेत; मात्र आता अर्थचक्र (economic cycle) रुळावर येत असून, कंपन्यांकडून नोकरभरती (job recruitment) वाढू लागल्याचं दिसतंय. त्यातच आता नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात (festive season) देशातल्या ई-कॉमर्स कंपन्या (e-commerce companies) मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी कामगारांची भरती करण्याच्या तयारीत आहेत. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. या वर्षी बंपर नोकरभरती सुरू होण्याची शक्यता आहे. टाटा, बिगबास्केट यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या नोकरभरती करण्याच्या तयारीत आहेत. नोकरभरतीची या कंपन्या एवढी घाई का करत आहेत, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. त्याची प्रमुख दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सणासुदीचा हंगाम आणि दुसरे कारण म्हणजे बेरोजगारीचा कमी झालेला दर. विद्यार्थ्यांनो, काही मिनिटांमध्ये होईल तुमचा मेंदू होईल शार्प; करा या Activity

    भारतात बेरोजगारीचा दर जानेवारीनंतर प्रथमच जुलैमध्ये 7 टक्क्यांच्या खाली आला. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रासमोरची आव्हानं वाढली आहेत. हे क्षेत्र आधीच कर्मचारी मिळत नसल्यामुळे अडचणीत आहे. त्यातच आता गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असा सणासुदीचा हंगाम जवळ आलाय. सणासुदीच्या काळात विक्री इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटींनी वाढते. या काळात कपडे, शूज, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान आदी वस्तू सर्वाधिक ऑर्डर केल्या जातात. ऑर्डर्सची संख्या वाढल्याने व त्या डिलिव्हरी करण्यास पुरेसं मनुष्यबळ नसेल, तर अनेकदा मालाची डिलिव्हरी होण्यास उशीर होतो. अशा वेळी गैरसोयीमुळे ग्राहक ऑर्डर रद्दही करतात. यामुळे कंपन्यांचे मोठं नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठीच सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्या नोकरभरती वाढवतात.

    त्याच अनुषंगाने ई-कॉमर्स कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या सर्वांत मोठ्या खरेदीच्या हंगामात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते, अशी भीती कंपन्यांना वाटत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतलाय. ऑनलाइन किराणा विक्रेती कंपनी असलेल्या बिगबास्केटचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीके बालकुमार यांच्या म्हणण्यानुसार, गिग वर्क फोर्सच्या मागणीत मोठी वाढ झालीय. टाटा समूहाने त्यांच्या बीबी नाऊ (BB Now) या झटपट डिलिव्हरी सेगमेंटमध्ये डिलिव्हरी भागीदारांची संख्या मार्च तिमाहीतल्या 500 वरून जून तिमाहीत 2200 पर्यंत वाढवली आहे. हे लक्ष्य मार्च 2023 पर्यंत सुमारे 6000 पर्यंत नेण्याचं आहे. क्या बात है! कोणतीही परीक्षा नाही; सूक्ष्म, लघु उद्योग मंत्रालयात थेट मिळेल Job दरम्यान, बिगबास्केट आणि ई-कॉमर्स फर्म डंझो यांच्याकडे ऑर्डर्सची डिलिव्हरी करण्यासाठी स्वतःचे कर्मचारी आहेत. कॉस्मेटिक्स-टू-फॅशन रिटेलर नायका यांसारख्या कंपन्या डिलिव्हरी सेवा देण्यासाठी थर्ड पार्टीवर अवलंबून असतात. थिंक टँक निती आयोगाने जूनमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गिग वर्क एम्प्लॉयमेंटमध्ये डिलिव्हरी कामगार आणि सेल्समन यांचा मोठा वाटा आहे. हा आकडा 2022-23मध्ये भारतात 90 लाखांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. तो 2019-20 च्या तुलनेत सुमारे 45 टक्के अधिक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: career , job , Job alert
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात