• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • टाटा मोटर्स पुणे इथे 10वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; आताच इथे करा अप्लाय

टाटा मोटर्स पुणे इथे 10वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; आताच इथे करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  पुणे, 28 जुलै: टाटा मोटर्स लिमिटेड पुणे (Tata Motors Pune Recruitment 2021) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.अप्रेंटिस या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती अप्रेंटिस (Full Term Apprentice) शैक्षणिक पात्रता अप्रेंटिस (Full Term Apprentice) - दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक. (प्रवर्गानुसार गुणांमध्ये सवलत) हे वाचा - Job Alert: नाशिक आरोग्य विभाग इथे नोकरीची संधी; 'या' पदासाठी होणार भरती वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 16 ते 18 वर्षांच्यामध्ये असणार आहे. तर मागासवर्गातील उमेदवारांना सवलत दिली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. 
  Published by:Atharva Mahankal
  First published: