Home /News /career /

Success Tips: नोकरीचं क्षेत्र कोणतंही असो आता होणार फक्त तुमचीच चर्चा; 'हे' स्किल्स लगेच घ्या शिकून

Success Tips: नोकरीचं क्षेत्र कोणतंही असो आता होणार फक्त तुमचीच चर्चा; 'हे' स्किल्स लगेच घ्या शिकून

कोणत्याही क्षेत्रात किंवा विषयामध्ये किंवा गोष्टीत यशस्वी व्हा.

कोणत्याही क्षेत्रात किंवा विषयामध्ये किंवा गोष्टीत यशस्वी व्हा.

अशाच काही स्किल्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे शिकून तुम्ही यशस्वी होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 12 जानेवारी: सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या आणि वेगवान काळात स्वतःला जगाच्या दोन पावलं पुढे ठेवण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. करिअर (Career Tips) मध्ये पुढे जाण्यासाठी अनेकजण निरनिराळे उपाय करतात. मात्र प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही जण प्रोफेशनल पद्धतीनं मेहनत करून समोर जातात (How to be Successful) तर काही जण बॉसचं कौतुक करून पुढे जातात. मात्र करिअरच नाही तर जगातील तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात किंवा विषयामध्ये किंवा गोष्टीत यशस्वी (Instant Success Tips) व्हायचं असेल तर (How to be successful) तुम्हाला काही सरळ आणि सोप्या गोष्टी (Soft skills to be successful) शिकणं महत्वाचं आहे. अशाच काही स्किल्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे शिकून तुम्ही यशस्वी होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया. टाइम मॅनेजमेंट स्किल   असं म्हणतात या जगात वेळेपेक्षा महत्त्वाची गोष्ट कुठलीच नाही. म्हणून सर्वात आधी तुमचा टाइम मॅनेज (How to manage time) करायला शिका म्हणजेच सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला जास्त वेळ द्या तर इतर गोष्टींना कमी वेळ द्या. आपली कामं आणि ऑफिसची कामं वेळेत पूर्ण करा. वेळेचं महत्त्वं लक्षात घेऊन काम करा. यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकाल. केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या कंपनीत परीक्षा न देताही मिळणार नोकरी; लगेच करा अर्ज टेक्निकल ज्ञान आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या काळात तुमच्या टेक्निकल ज्ञान (Technical knowledge) असणं अतिशय आवश्यक आहे. ज्यांना टेक्निकल ज्ञान नाही अशा लोकांना कुठेही जागा मिळू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा कुठे काम करत असाल तर करिअरमध्ये समोर जाण्यासाठी तुम्हाला टेक्निकल ज्ञान मदत करू शकेल. स्वतःचं स्पष्ट मत ठेवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना आपलायसोबत अनेक निरनिराळ्या स्वभावाची माणसं काम करत असतात. या सर्वांना सांभाळून काम करणं म्हणजे कठीण काम आहे. म्हणूनच कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं मत हे अगदी स्पष्टपणे आणि परखडपणे व्यक्त करा. यामुळे तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही आणि तुमचा आदर होईल. डिजिटली स्ट्रॉंग व्हा आजकालच्या कळत टेक्नॉलॉजीसोबतच संगणकाचं (Computer knowledge) ज्ञान असणंही आवश्यक आहे. तुम्ही जिथे कुठे काम करत साला तिथे संगणक नसेल असं होऊ शकत नाही. म्हणूनच नवीन पदवीधारकानं योग्य संगणक कोर्स करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला नोकरी मिळविण्यात डिजिटल साक्षरतेचा (Digital Literacy) पूर्ण लाभ मिळेल. तुमचंही शिक्षण कॉमर्समध्ये झालंय? मग 'या' सहकारी सोसायटीत Vacancy; लगेच करा अर्ज कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक जर तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत असाल तर तुमच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा तुमच्या बॉसशी संवाद सांधण्यासाठी तुमच्याकडे योग्य ते कम्युनिकेशन स्किल (how to improve Communication Skills) असणं आवश्यक आहे. तुमच्या बोलण्यातून तुम्ही समोरच्यांची मनं जिंकून घेऊ शकता. त्यामुळे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला यात मदत करू शकतात.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Success, Tips

    पुढील बातम्या