मुंबई, 31 मे: मनात जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर कितीही कठीण परिस्थिती अली तरी माणूस शकत नाही. अशीच काहीशी इच्छा असणाऱ्या अनेक तरुण तरुणींबद्दल (Inspiring success story of youth) आपण ऐकलं असेलच. मात्र भयंकर पुरात घर असताना तसंच संपूर्ण कुटुंबाला कोरोनासारख्या महामारीनं गाठलं असतानाही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मिरजच्या प्रमोद चौगुले (Success story of Pramod Chaugule MPSC Topper) याच्याबद्दल आज आम्ही सांगणार आहोत. आजच MPSC (MPSC success stories) नं जाहीर केलेल्या अंतिम निकालात प्रमोद चौगुले यांनी बाजी मारली आहे. ते संपूर्ण राज्यभरातून प्रथम आले आहेत. प्रमोद मात्र इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा खरंच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारा आहे. “तू कलेक्टर आहेस का?” या एका वाक्यामुळे बदललं संपूर्ण आयुष्य; डॉक्टर झाली IAS
प्रमोद हे मूळचे मिरज तालुक्यातील सोनी या गावचे आहेत. ते विवाहित असून त्यांना एक मुलगी देखील आहे. तसंच प्रमोद यांचे वडील टेम्पो चालक आहे तर आई टेलरिंगचं काम करते. “मी अनेक वर्षांपासून MPSC आणि UPSC ची तयारी करत आहे. मात्र गेल्यावेळी मला MPSC मध्ये रँक घेता आला नव्हता. मात्र यंदा मी ते करून दाखवलं” असं प्रमोद सांगतात.
प्रमोद यांचं प्राथमिक शिक्षण हे सोनी गावातच झालं. त्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळालं. यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. मात्र त्यांना आधीपासूनच MPSC आणि UPSC परीक्षांसाठी तयारी करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुरुवात केली. तसंच प्रमोद हे आपल्या पत्नीला आणि मुलीला सोडून पुण्यात MPSC च्या तयारीसाठी राहत होते. UPSC टॉपर म्हणते, “पहिल्या नंबरची अपेक्षा नव्हती!” वाचा कोण आहे श्रुती शर्मा
गेल्यावेळी सांगलीमध्ये आलेल्या पुरात प्रमोद यांचं संपूर्ण घर होतं. तसंच कोरोनाकाळात त्यांच्या कुटुंबाला कोरोनानं गाठलं होतं. मात्र या कठीण परिस्थितीमधूनही मार्ग काढत प्रमोद यांनी MPSC परीक्षेत बाजी मारली. यामुळे प्रमोद यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तसंच राज्यातील आणि देशातील अनेक तरुण तरुणींसाठी प्रमोद चौगुले हे प्रेरणा आहेत.