जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / ब्लॉग लिहून करिअरची सुरुवात, आज करतायेत 500हून अधिक ब्रँड्ससोबत काम; मुनीश मायांचा प्रेरणादायी प्रवास

ब्लॉग लिहून करिअरची सुरुवात, आज करतायेत 500हून अधिक ब्रँड्ससोबत काम; मुनीश मायांचा प्रेरणादायी प्रवास

ब्लॉग लिहून करिअरची सुरुवात, आज करतायेत 500हून अधिक ब्रँड्ससोबत काम; मुनीश मायांचा प्रेरणादायी प्रवास

मुनीश यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक ब्लॉग (Blog) लिहून केली होती. आज एका दशकानंतरची परिस्थिती पाहिली, तर या कालावधीत त्यांनी 500पेक्षा अधिक फॉर्च्युन ब्रँड्ससह (Fortune Brands) काम केलं आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली 09 ऑक्टोबर : मुनीश माया (Munish Maya) हे व्यक्तिमत्त्व अजब आहे. ते एक यशस्वी उद्योजक तर आहेतच; पण लाइफ कोच (Life Coach), मोटिव्हेटर (Motivator) आणि इन्फ्लुएन्सर (Influencer) म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांना भारतातल्या पहिल्या ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर (Global Brand Ambassador) पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. मुनीश आपल्या फॉलोअर्सना असा सल्ला देतात, की त्यांना स्वतःला ज्या क्षेत्रात रुची असेल, त्या क्षेत्राला त्यांनी फॉलो करावं. कारण जोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या (Mentally Balanced) स्वतः संतुलित असल्याचं अनुभवत नाही, तोपर्यंत आपण कितीही काही मिळवलं, तरी जीवनात खूश राहू शकत नाही, असं मुनीश म्हणतात. ‘ती’ लग्नात बनते वधूची मैत्रीण आणि करते लाखोंची कमाई; भन्नाट करिअरबद्दल वाचाच मुनीश माया यांना आज मिळालेलं यश अचानक मिळालेलं नाही. त्यांचे कष्ट आणि सातत्य यांमुळे ते आज या स्थानावर येऊन पोहोचले आहेत. मुनीश पंजाबी आहेत आणि पंजाबमध्ये यशाची व्याख्या केवळ इंजिनीअरिंगशी (Engineering) जोडलेली आहे. कुटुंबीयांच्या आग्रहावरून त्यांनी थापर युनिव्हर्सिटीतून इंजिनीअरिंग केलं; मात्र त्यांच्यासाठी त्यांचं पॅशन (Passion) जास्त महत्त्वाचं होतं. मुनीश यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक ब्लॉग (Blog) लिहून केली होती. आज एका दशकानंतरची परिस्थिती पाहिली, तर या कालावधीत त्यांनी 500पेक्षा अधिक फॉर्च्युन ब्रँड्ससह (Fortune Brands) काम केलं आहे. त्यातलं एक नाव मिंत्रा शॉपिंग अॅप्लिकेशन हेही आहे. इन्फ्लुएन्सर शब्द आज खूप प्रचलित आहे; मात्र तो शब्द प्रचलित नव्हता, तेव्हापासूनच मुनीश माया यांनी इन्फ्लुएन्सर होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली होती. Festival Offer: गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी ही ऑफर नक्की वाचा; जिंका सोनं मुनीश माया आपल्या फॉलोअर्सना आपापल्या उद्दिष्टांवर (Goals) लक्ष केंद्रित करायला सांगतात. कोणतंही लक्ष्य गाठताना जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो, असंही ते सांगतात. चढ-उतार हा आयुष्याचा भाग असून, ते नसतील, तर जीवन मृत्यूसमान आहे. त्यामुळेच ते स्वीकारा आणि त्यातून धडा घेऊन वाटचाल पुढे सुरू करा, असा सल्ला ते देतात. बदल हेच जीवनाचं सत्य आहे आणि त्याशिवाय जीवन शून्य आहे. त्यामुळे जीवानात जे समोर येईल, त्याला सामोरं गेलं पाहिजे, असं ते म्हणतात. मुनीश म्हणतात, की माणसाचं सर्वांत मोठं अपयश म्हणजे त्याची भीती. भय असेल, तर कोणतीही व्यक्ती जीवनात यश प्राप्त करू शकत नाही. आनंदी आणि सुखी जीवन जगायचं असेल, तर प्रत्येक व्यक्ती मानसिकदृष्ट्या सुखी असेल, तरच शक्य होऊ शकतं. व्यक्ती जेव्हा स्वतःच्या मनाप्रमाणे जीवन जगू शकेल, तेव्हाच ती मानसिकदृष्ट्या सुखी होऊ शकेल, असं मुनीश माया म्हणतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात