मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Unique Career: ‘ती’ लग्नात बनते वधूची मैत्रीण आणि करते लाखोंची कमाई; भन्नाट करिअरबद्दल वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Unique Career: ‘ती’ लग्नात बनते वधूची मैत्रीण आणि करते लाखोंची कमाई; भन्नाट करिअरबद्दल वाचून तुम्हीही व्हाल थक्क

हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला आहे, की अनेक मुली हेच करिअर करू लागल्या आहेत. या कामासाठी त्यांना छान छान ड्रेस आणि भरपूर पैसेही मिळतात.

हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला आहे, की अनेक मुली हेच करिअर करू लागल्या आहेत. या कामासाठी त्यांना छान छान ड्रेस आणि भरपूर पैसेही मिळतात.

हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला आहे, की अनेक मुली हेच करिअर करू लागल्या आहेत. या कामासाठी त्यांना छान छान ड्रेस आणि भरपूर पैसेही मिळतात.

लग्न (Wedding) म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा सोहळा असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे लग्नसोहळा अविस्मरणीय व्हावा, उपस्थितांनी त्याची नेहमी आठवण ठेवावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळं आजकाल लग्नसोहळा वेगळा ठरावा यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. मेंदी, संगीत, रिसेप्शन (Wedding reception ideas) असे विविध कार्यक्रम होत असतात. त्याशिवाय कपडे, दागिने, सजावट, जेवण यापैकी कुठेच कसली कमतरता राहू नये म्हणून प्रचंड पैसा खर्च केला जातो. लग्नसोहळे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी केले जातात किंवा एखादी विशिष्ट संकल्पना ठरवून त्यावर आधारित सगळा सोहळा आयोजित केला जातो. अशा या लग्नसोहळ्यात एक गोष्ट अत्यंत महत्त्वही असते ती म्हणजे वधूच्या बहिणी आणि मैत्रिणी.

पाश्चात्य देशांत तर विवाहसमारंभात वधूच्या मैत्रिणी म्हणजे ब्राइड्समेडना (Bride Maid) खास महत्त्व असतं. एकसारखे ड्रेस घातलेल्या या ब्राइड्समेड वधूला आणण्यापासून ते तिची पाठवणी करेपर्यंत तिच्या पाठीमागे असतात. सध्या तर या ब्राइड्समेड पैसे देऊन आणण्याचा अजब ट्रेंड (Bride Maid trends) सुरू झाला आहे. हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला आहे, की अनेक मुली हेच करिअर करू लागल्या आहेत. या कामासाठी त्यांना छान छान ड्रेस आणि भरपूर पैसेही मिळतात.

हे वाचा - BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

'झी न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतल्या (USA) जेन ग्लान्ट्झ (Jane Glantz) या तरुणीनं पैसे घेऊन ब्राइड्समेड (Bridesmaid) होण्याचं काम सुरू केलं असून, याद्वारे ती भरपूर कमाई करत आहे. जेन ग्लांट्झ असं या तरुणीचं नाव असून, सोशल मीडियावर तिनं आपल्या या अनोख्या करिअरबाबत सांगितलं आहे. अगदी योगायोगानं सुरू झालेलं हे काम आज जेनची ओळख ठरलं आहे. गेल्या सात वर्षांपासून ती हे काम करत असून, अनेक लग्नांमध्ये तिनं ब्राइड्समेड बनण्याचं काम केलं आहे. या कामातून जेनला भरघोस पैसे (Money) आणि उत्तम ड्रेसची (Dress) कमाई होते. त्यातून तिच्याकडे उंची कपड्यांचा इतका उत्तम संग्रह तयार झाला आहे, की त्याद्वारे ती आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकते, असं जेननं म्हटलं आहे.

जेन आपल्या कामात आता इतकी तरबेज झाली आहे की, नवरदेवाच्यादेखील लक्षात येत नाही, की ही ब्राइड्समेड त्याच्याइतकीच वधूसाठीदेखील अनोळखी आहे. आपण जगातली पहिली पेड ब्राइड्समेड (Paid Bridesmaid) असल्याचा दावा जेननं केला आहे. जेनच्या या कामानं अनेकांना मोहात पाडलं असून, अनेकांना या अनोख्या करिअरनं आकर्षित केलं आहे. जेननं याबाबतचं प्रशिक्षण द्यावं अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.

जेननं सुरू केलेल्या या अनोखा ट्रेंडमुळे एका अनोख्या करिअरचा मार्ग अनेक तरुणीसमोर खुला झाला असून, हळूहळू हा ट्रेंड आणखी व्यापाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First published:

Tags: Career opportunities, World news, जॉब