• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Festival Season Offer : गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी ही ऑफर नक्की वाचा; जिंकू शकता सोनं

Festival Season Offer : गॅस सिलिंडर बुक करण्यापूर्वी ही ऑफर नक्की वाचा; जिंकू शकता सोनं

दरवाढ झाली असताना खरेदीदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंगवर सोनं जिंकू शकता. ऑनलाइन पेमेंट कंपनी पेटीएम गॅस सिलेंडर बुकिंगवर विशेष नवरात्री गोल्ड ऑफर घेऊन आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : ऑक्टोबर महिन्यापासून देशभरात उत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे. पण, यावेळी सण सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. बुधवारी 6 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 899.50 झाली आहे. दरवाढ झाली असताना खरेदीदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंगवर सोनं जिंकू शकता. ऑनलाइन पेमेंट कंपनी पेटीएम गॅस सिलेंडर बुकिंगवर विशेष नवरात्री गोल्ड ऑफर घेऊन आली आहे. ज्या अंतर्गत 7 ते 16 ऑक्टोबर दरम्यान 5 भाग्यवान वापरकर्ते दररोज 10,001 रुपयांचे पेटीएम डिजिटल गोल्ड जिंकतील. नवरात्री सोने पेमेंट योजना काय आहे? ही ऑफर पेटीएम अॅपवर 'बुक गॅस सिलिंडर' सुविधेचा वापर करून केलेल्या विद्यमान अन-बुक केलेल्या सिलेंडर बुकिंगच्या पेमेंटवर देखील लागू होईल. याव्यतिरिक्त, सर्व वापरकर्त्यांना प्रत्येक बुकिंगवर 1000 पर्यंत कॅशबॅक पॉईंटही मिळू शकतात. जे आपण पेटीएमवरून दुसऱ्या वस्तू खरेदी करणे, किंवा बील चुकते करण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि रिवॉर्ड व्हाउचरसाठी वापरले जाऊ शकतात. ही 'नवरात्री गोल्ड' ऑफर इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या सर्व 3 प्रमुख एलपीजी कंपन्यांच्या सिलेंडर बुकिंगवर लागू आहे. हे वाचा - मैत्रिणीनं प्रेमास नकार दिल्यानं सांगलीतील तरुणाचा हाय होल्टेज ड्रामा; आत्महत्येसाठी टेरेसवर चढला पण… पेटीएमने अलीकडेच काही नवीन फिचर्स वाढवली आहेत. ज्याद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या गॅस सिलिंडरची डिलिव्हरी ट्रॅक करण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे. आणि रिफिलसाठी Automated Intelligent Reminders द्वारे सिलेंडर बुकिंगचा अनुभव आणखी चांगला बनवला आहे. हे वाचा - बलात्कार करण्याआधी महिलांना हे 3 पर्याय द्यायचा आरोपी, मग करायचा घृणास्पद कृत्य, अखेर अटक एलपीजी बुकिंग कसे करावे? गॅस बुकिंगसाठी वापरकर्त्यांना 'बुक गॅस सिलेंडर' टॅबवर जावे लागते. येथे तुम्हाला तुमची गॅस कंपनी निवडावी लागेल. पुढे, मोबाईल नंबर / एलपीजी आयडी / ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा आणि नंतर पेटीएम वॉलेट सारख्या तुमच्या पसंतीच्या पध्दतीचा वापर करून पेमेंट करा. दुसरीकडे, पेटीएम यूपीआय, कार्ड, नेट बँकिंग किंवा पेटीएम पोस्टपेड, ज्याद्वारे ग्राहकांना आत्ताच बुकिंग आणि पुढील महिन्यात पैसे देण्याचा पर्याय असेल. सिलेंडर जवळच्या गॅस एजन्सीद्वारे नोंदणी केलेल्या पत्त्यावर वितरित केले जाते.
  Published by:News18 Desk
  First published: