मुंबई : बारावीची परीक्षा ही काही आयुष्यतली शेवटची परीक्षा नाही. नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं तर काही विद्यार्थ्यांना मनासारखं यश मिळालं नाही. काही विद्यार्थ्यांच्या पदरात अपयश आलं. मग अशावेळी पराभूत न होता जिद्द न खचता पुन्हा उभं राहता येणं महत्त्वाचं. 12 वी नापास असूनही IPS पर्यंत पोहोचलेल्या आज एका अधिकारी संघर्ष कहाणी समजून घेणार आहोत.
मनोज कुमार शर्मा यांना बारावीमध्ये अपयश आलं. त्यावेळी त्यांनाही थोडा मानसिक ताप झाला. मात्र यातून त्यांनी धडा घेतला आणि जिद्दीच्या जोरावर पुन्हा नव्याने सुरुवात केली. आज ते IPS पदावर कार्यरत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC परीक्षा) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी अनेक विद्यार्थी या परीक्षेला बसतात. पण यश काही लोकांनाच मिळते.
UPSC पास होणं खायची गोष्ट नाही! लेक 18 तास करायची अभ्यास, कश्मिराच्या आईने सांगितलं गुपित
या परीक्षेत एकाच वेळी यश न मिळाल्यास हार न मानणारे अनेक विद्यार्थी आहेत आणि सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यश संपादन करतात. अशीच काहीशी कहाणी आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची आहे. मनोज आज अधिकारी असेल पण इथपर्यंत पोहोचणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. शर्मा यांनी आयुष्यात कधीही हार मानली नाही.
मनोज शर्मा हे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले मनोज कुमार शर्मा 9वी आणि 10 वी मध्ये तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. बारावी बोर्डाच्या परीक्षेत तो हिंदी वगळता इतर सर्व विषयांत नापास झाले होते. एवढ्या कमकुवत विद्यार्थ्यावर कोणी कसा विश्वास ठेवू शकतो की तो यूपीएससी सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करू शकेल. पण मनोजचा स्वतःवर विश्वास होता.
बारावीत नापास झाले तरीही आज आहेत IAS IPS अधिकारी
बारावीत नापास झाल्यानंतर मनोज यांनी भावासोबत टेम्पो चालवण्यास सुरुवात केली. एकदा ऑटो चालवत असताना पोलिसांनी मनोज यांची रिक्षा अडवली. त्यांनी जप्त केली ती सोडवण्यासाठी त्यांनी SDM ना विनंती केली. मनोज यांनी SDM यांची भेट घेतली खरी मात्र रिक्षा सोडवण्याऐवजी त्या पोस्टपर्यंत कसं पोहोचायचं याची माहिती घेतली.
मनोज कुमार शर्मा यांना एक मुलगी 12 वीला असताना खूप आवडायची पण नापास झाल्यामुळे तिला विचारणार कसं हे अढी मनात कायम होती. विचार आणि भीती अशा दोन्ही गोष्टी घोळत होत्या. मनोज यांनी अखेर त्या मुलीला विचारलं आणि ती हो देखील म्हणाली. पुढे जाऊन त्यांनी लग्नही केलं.
मनोज यांनी ज्या तरुणीशी विवाह केला तिचं नाव श्रद्धा जोशी आहे. श्रद्धा यांनी मनोज यांनी खूप मानसिक आधार दिला. त्याच बळावर ते IPS पर्यंत पोहोचल्याचं सांगतात. मनोज कुमार शर्मा यांनी UPSC ची परीक्षा चारवेळा दिली. चौथ्यांदा त्यांना IPS होण्यासाठी यश आलं. सध्या ते मुंबई पोलिसांच्या एडिशनल कमिश्नर पदावर कार्यरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, HSC Result, Success Story