मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /UPSC पास होणं खायची गोष्ट नाही! लेक 18 तास करायची अभ्यास, कश्मिराच्या आईने सांगितलं गुपित

UPSC पास होणं खायची गोष्ट नाही! लेक 18 तास करायची अभ्यास, कश्मिराच्या आईने सांगितलं गुपित

X
युपीएससी

युपीएससी परीक्षेत ठाण्याची कश्मिरा संख्ये महाराष्ट्रात पहिली आलीय.

ठाण्याची कश्मिरा संख्ये युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात पहिली कशी आली? याचं गुपीत तिच्या आईनं शेअर केलंय.

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी

ठाणे, 24 मे 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. या परीक्षेत ठाण्याची कश्मिरा संख्ये ही महाराष्ट्रात पहिली तर देशात 25 वी आली आहे. नोकरी, व्यवसाय सांभाळून कश्मिरानं या परीक्षेचा अभ्यास केला. देशातील सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या परीक्षेत ती महाराष्ट्रात पहिली आली आहे. कश्मिरानं हे यश कसं मिळवलं? याचं गुपित तिच्या आई डॉ. प्रतिमा संख्ये यांनी  शेअर केलंय.

अभ्यासाबाबत सांगावं लागलं नाही...

कश्मीराचे 1 ते 4 थी पर्यंतचे शिक्षण मुलुंड येथील सेंट मेरी स्कूलला झाले. त्यानंतर 5 ते 10 वी तिने पवार पब्लिक स्कूल भांडुप येथे पूर्ण केले. कश्मिरा लहाणपाणासून अभ्यासात हुशार होती. तिला अभ्यास करावं असं कधीही सांगावं लागलं नाही. तिला दहावीतही  94 टक्के मार्क्स होते असे तिच्या आईनं सांगितलं.

कश्मिरानं अकरावी आणि बारावीचं शिक्षण वझे केळकर कॉलेज मुलुंड येथे केले. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या कश्मीराने 12वी आणि सी. ई. टी या दोन्ही परिक्षेतही घवघवीत गुण प्राप्त केले. त्यानंतर तिला मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालयात प्रवेश मिळाला. डेंटिस्ट झालेल्या कश्मिराला आय. एस. चे स्वप्न खुणावत होते. त्यामुळे डेंटिस्ट झाल्या झाल्या तिने यू. पी. एस. सी. परीक्षेची तयारी सुरू केली.

कोरोना व्हायरसमुळे तिला सुरूवातीला अडथळे आले. त्या परिस्थितीमध्येही तिनं कोणतीही हार न मानता अविरत मेहनत घेतली. त्यामुळेच ती युपीएससीच्या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली, अशी माहिती तिच्या आईनं दिली.

UPSC : आई विडी कामगार तर वडील शेतकरी, हार न मानता मंगेशनं अखेर करून दाखवलं, पाहा Video

कसा केला अभ्यास?

कश्मिरा रोज 16 ते 18 तास अभ्यास करायची. यावेळी ती 50 मिनिटे अभ्यास केला की 10 मिनिटे ब्रेक घेत असे. या दहा मिनिटात ती अभ्यासाचा कोणताही विचार मनात आणत नसे. या दहा मिनटात ती फेरफटका मारून येत असे. पण 10 मिनिटाच्यावर तिने एक मिनिट सुद्धा घालवला नाही. त्यानंतर परत रिव्हिजन करत असे. या पद्धतीनं तीचा चांगला अभ्यास झाला.

यूपीएससी परीक्षेत इंटरव्ह्यू हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्याचा सराव व्हावा यासाठी दिल्लीमध्ये काही मॉक इंटरव्ह्यू घेतले जातात. निवृत्त क्लास 1 अधिकारी हे इंटरव्ह्यू घेतात. कश्मिरानंही हे इंटरव्ह्यू दिले. त्यानंतर ती इंटरव्ह्यूचा रोज सराव करत असे. त्याचाही तिला मोठा फायदा झाला, असं डॉ. प्रतिमा यांनी सांगितलं.

वडील सोडून गेले, सांभाळणाऱ्या मामालाही कोरोनानं हिरावलं, अखेर 6 व्या प्रयत्नात भावना झाली IAS

कश्मिराची तयारी पाहाता तिला यश मिळेल हा विश्वास होता. पण, ती थेट सिक्सर मारेल असं वाटलं नाही. तिचं पोस्टींग महाराष्ट्रात झालं तर आनंद होईल. पण देशसेवा करण्यासाठी ती कोणत्याही राज्यात काम करायला तयार आहे. कश्मिराच्या अभिनंदनानं भारावून गेल्याचं प्रतिमा यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Career, Local18, Success Story, Thane, Upsc exam