मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Study Tips: तुम्हीही रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करता? मग जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

Study Tips: तुम्हीही रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करता? मग जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

रात्रभर जागून अभ्यास करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

रात्रभर जागून अभ्यास करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला रात्रभर जागून अब्यास करण्याचे फायदे आणि तोटे (Pros And Cons Of Late Night Study) सांगणार आहो

    मुंबई, 30 डिसेंबर: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शाळा, कॉलेजेस सुरु झाले आहेत. त्यामुळे परीक्षाही सुरु झाल्या आहेत. गेले कित्येक महिने ऑनलाईन शाळा (Online Education) आणि परीक्षा सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सवय तुटली होती. मात्र आता परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास (How to study well) करावा लागतोय. काही विद्यार्थ्यांना रात्रभर जागून (How to study at night) अभ्यास करायची सवय असते. मात्र अनेकदा या रात्रीच्या अभ्यासामुळे फायदा (Benefits of Night Study) होतो तर अनेकदा यामुळे तोटेही (cons of night study) होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला रात्रभर जागून अभ्यास करण्याचे फायदे आणि तोटे (Pros And Cons Of Late Night Study) सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत यात शंका नाही. खरे तर त्या वेळी मन पूर्णपणे फ्रेश असते. पण याचा अर्थ असा नाही की रात्रीच्या वेळी अभ्यास करण्यात फायदाही आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची क्षमता असते आणि त्यानुसार तो आपल्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवतो. मात्र अनेकदा रतरी अभ्यास केल्यामुळे प्रकृतीच्या समस्या जाणवू शकतात. JOB ALERT: तुम्हीही टायपिंग उत्तीर्ण असाल तर 'या' ज़िल्हा परिषदेत जॉबची संधी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करण्याचे फायदे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात त्यांनाही अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही फक्त रात्रीच अभ्यास करणे पसंत केले तर हे फायदे जाणून घेतल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सतर्क राहण्याची आणि एकाग्रता ठेवण्याची क्षमता चांगली असते. कोणतीही माहिती ते दीर्घकाळ लक्षात ठेवू शकतात. रात्रीच्या वेळी कोर्टिसोलची पातळी जास्त असल्याने परीक्षेचा ताण टळतो. काय सांगता! परीक्षेत अव्वल येण्यासाठी विद्यार्थी घेताहेत Study Drugs; वाचा कारण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करण्याचे तोटे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करण्यात काही नुकसान नाही असा अजिबात अर्थ नाही. जाणून घ्या रात्री उशिरापर्यंत अभ्यासाचे तोटे. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की विद्यार्थी रात्री वाचलेल्या गोष्टी सकाळी विसरतात. पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदूच्या तीक्ष्णतेवर परिणाम होतो. जर तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयात गेलात किंवा ऑनलाइन क्लासेसमध्ये जात असाल तर तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या