मराठी बातम्या /बातम्या /करिअर /काय सांगता! परीक्षेत अव्वल येण्यासाठी विद्यार्थी घेताहेत Study Drugs; सेवन करताच येतात चांगले मार्क्स

काय सांगता! परीक्षेत अव्वल येण्यासाठी विद्यार्थी घेताहेत Study Drugs; सेवन करताच येतात चांगले मार्क्स

 काय आहेत Study Drugs? वाचा

काय आहेत Study Drugs? वाचा

शी औषधं अगदी सहज आणि केवळ 200 रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्यानं ती सेवन (What are Study Drugs?) करण्यावर तिथल्या विद्यार्थांचा भर असतो

    मुंबई, 30 डिसेंबर: आपला पाल्य हुशार असावा, त्याने उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण व्हावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. यासाठी पालकदेखील विशेष परिश्रम घेत असतात. मुलांची बुद्धिमत्ता उत्तम असावी, यासाठी काही पालक मुलांवर वैद्यकीय उपचारही करतात. ब्रिटनमध्येही (Britain) असंच चित्र पाहायला मिळतं. तेथील विद्यापीठांमध्ये (Universities) शिकणारे विद्यार्थी (Students) चांगले मार्क्स मिळवून परीक्षेत यशस्वी (How to be successful) होण्यासाठी, तसंच उत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी `स्टडी ड्रग्ज`ची (Study Drugs) मदत घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशी औषधं अगदी सहज आणि केवळ 200 रुपयांमध्ये उपलब्ध होत असल्यानं ती सेवन (What are Study Drugs?) करण्यावर तिथल्या विद्यार्थांचा भर असतो. याविषयीचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे.

    `द टाइम्स`च्या वृत्तानुसार, ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड, नॉटिंगहॅम, एडिंबरा युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पदवीचं शिक्षण घेणारे विद्यार्थी स्टडी ड्रग्ज घेत असल्याचं दिसून आलं आहे. स्टडी ड्रग्ज हे एक विशेष औषध (Special Medicine) असतं. जे रुग्ण एडीएचडी (ADHD) या विकारानं ग्रस्त असतात, ज्या विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेताना अडचणी येतात किंवा ज्यांना ऑफिसमध्ये काम करताना अडचणी जाणवतात अशा व्यक्ती या औषधांचं सेवन करतात. ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते, त्या व्यक्तीदेखील अशी औषधं घेतात. या औषधांमध्ये एड्डरेल आणि रिटेलिन हे घटक असतात.

    काय सांगता! NASA विविध धर्मांच्या पुरोहितांद्वारे एलिअन्सशी साधणार संवाद? वाचा

    `किड्स हेल्थ`च्या अहवालात तज्ज्ञांनी या औषधांचे दुष्परिणाम नमूद केले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही औषधं खासकरून `एडीएचडी`सारख्या विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिली जातात. या रुग्णांमधल्या आजाराची तीव्रता पाहून ही औषधं प्रिस्क्राइब केली जातात. सामान्य व्यक्तींनी ही औषधं घेतली तर त्यांना साइड इफेक्ट्स (Side Effect) होऊ शकतात. यामुळे हृदय (Heart) आणि मेंदूवर (Brain) विपरीत परिणाम होऊ शकतो. हाय ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके अनियमित होणं, हार्ट फेल होणं, फिट येणं किंवा स्ट्रोक येणं असे गंभीर आजार होऊ शकतात.

    या औषधांमुळे शरीरात अल्पकालीन बदल होतात. ही औषधं थेट मेंदूवर परिणाम करतात. या औषधांचं सेवन केल्यावर मेंदूत विशेष प्रकारची रसायनं (Chemical) स्रवतात. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. यामुळे व्यक्ती एका विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकते. शरीरातली ऊर्जादेखील वाढते. याशिवाय व्यक्तीचा श्वासोच्छ्वास आणि हृदयाची गती वाढू लागते. रक्तदाबदेखील वाढतो. या ड्रग्जमुळे व्यक्तीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढत नाही. हा परिणाम औषध घेतल्यानंतर काही काळ दिसून येतो.

    62 वर्षीय अर्धांगवायूग्रस्त ​​रुग्णानं फक्त विचार केला अन् ट्विट झालं पोस्ट!

    तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सामान्य व्यक्तींनी अशी ड्रग्ज घेण्याची गरज नाही. जीवनशैलीत (Lifestyle) योग्य बदल केल्यास त्याचे परिणाम स्टडी ड्रग्जप्रमाणे दिसून येतात. दिवसभरात केव्हाही काही मिनिटं मेडिटेशन (Meditation) केल्यास तणाव दूर होऊन एकाग्रता वाढण्यास मदत होते. संशोधनातून ही बाब सिद्ध झाली आहे. उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पोषक आहार गरजेचा असतो. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये योग्य बदल करावा. आहारात कडधान्यं, फळे, भाजीपाला, मासे यांचा समावेश करावा. व्यायामाचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतो. त्यामुळे शरीर कार्यक्षम राहतं. व्यायामामुळे शिकण्याचं कौशल्य आणि बुद्धी वाढते. तसंच मूडदेखील चांगला राहतो. मेंदूची एकाग्रता वाढवण्यासाठी पुरेशी झोप (Sleep) घेणंदेखील गरजेचं आहे. दररोज रात्री किमान 9 तास झोप घेतल्यास ताण आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. जीवनशैलीत अशा पद्धतीनं बदल केल्यास शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी स्टडी ड्रग्ज घेण्याची गरज पडणार नाही.

    First published:

    Tags: Drugs, School student, World news