• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Study in Abroad: परदेशात शिक्षणासाठी 'हे' आहेत टॉप 4 देश; Visa मिळण्यासही होणार नाही अडचण

Study in Abroad: परदेशात शिक्षणासाठी 'हे' आहेत टॉप 4 देश; Visa मिळण्यासही होणार नाही अडचण

आज आम्ही तुम्हाला जगातील असे काही देश सांगणार आहोत जिथे जाताना तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : ग्रॅज्युएट (Graduate) झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना परदेशात (Study in Abroad) जाऊन पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असते. त्यासाठी विद्यार्थी अनेक प्रकारच्या परीक्षा देतात. त्यानुसार परदेशात शिक्षणासाठी (Study in Abroad) जातात. मात्र त्यांना या सर्व प्रक्रियेत त्रास होतो. अनेक अडचणी समोर येतात. काही देशांमधील विचित्र कायद्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. अंतर आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला जगातील असे काही देश (Top countries for higher studies) सांगणार आहोत जिथे जाताना तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. कॅनडा (Canada) कॅनडा हा देश जगातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पंढरी मानला जातो. दरवर्षी जगभरातील लाखो विद्यार्थी कॅनडाला शिक्षणासाठी (Education in Canada) येतात. भारतातील अनेक विद्यार्थी कॅनडाला जातात कारण इथे शिक्षणासाठी लागणार खर्च, राहणीमान अशा गोष्टी विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. विशेष म्हणजे कॅनडाला शिक्षणासाठी (Study in Canada) जाताना visa ही लगेच मिळतो. अंतर यासाठी कॅनडातील कॉलेजमध्ये प्रवेश घेणं आवश्यक आहे. हे वाचा -Interview देताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी करायला विसरू नका; अन्यथा नोकरी जाणार जर्मनी (Germany) जर्मनी देशात शिक्षणासाठी पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये (Public University) कुठल्याही शुल्क आकारलं जात नाही त्यामुळे या देशात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ जास्त असतो. विद्यार्थ्यांना इथे कमीतकमी पैसे करून राहता येतं आणि शिक्षण घेता येतं. तसंच या देशात शिक्षणासाठी (Study in Germany) येण्याचा visa ही लगेच मिळतो. त्यामुळे जर्मनी हा देश शिक्षणासाठी उत्तम मानला जातो. आयर्लंड (Ireland) आयर्लंड  (Ireland) या देशातही उच्चस्तराचं शिक्षण मिळतं त्यामुळे जगभरातील अनेक विद्यार्थी इथे शिक्षणासाठी (Study in Ireland) जातात. भारतीय विद्यार्थ्यांसाठी या देशाचा visa मिळणं सर्वात सोपी गोष्ट आहे. ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर या देशाचा visa मिळतो. न्यूझीलँड (New Zealand) न्यूझीलँड देशात शिक्षणाला (Study in New Zealand) जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या स्टुडंट visa ची गरज पडत नाही. तसंच या देशात शिक्षणाला जाण्यासाठीचे नियम अमेरिकेसारखे (America) कठोर नाहीत. त्यामुळे या देशात शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी जातात.
  Published by:Atharva Mahankal
  First published: