मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Interview देताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी करायला विसरू नका; अन्यथा हातची नोकरी जाणार

Interview देताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी करायला विसरू नका; अन्यथा हातची नोकरी जाणार

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अंमलात आणाल तर नोकरी फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळेल.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अंमलात आणाल तर नोकरी फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळेल.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अंमलात आणाल तर नोकरी फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळेल.

मुंबई, 24 जून: कोरोना महामारीमुळे (Corona virus) अनेकांची नोकरी धोक्यात (Jobs in corona) आली आहे. तर काही जणांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मात्र आता कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होऊ लागल्यामुळे काही कंपन्यांनी पुन्हा पदभरती (Latest jobs) सुरु केली आहे. यासाठी Interview घेण्यास सुरुवात केली आहे. फ्रेशर्सही नोकरी (Freshers Jobs)  मिळवण्यासाठी Interview देत आहेत. मात्र अनेकदा भरपूर लोक Interview देताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. यामुळे त्यांना नोकरी (jobs openings) मिळू शकत नाही. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अंमलात आणाल तर नोकरी फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळेल. चला तर मग जाणून घेऊया.

Interview साठी वेळेच्या आधी जा

Interview साठी ठरलेल्या वेळेच्या किमान अर्धा तास आधी पोहोचणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला तिथल्या वातावरणानुसार रिलॅक्स होता येईल. Interview साठी उशीर केला तर तो तुमचा निष्काळजीपणा समजला जाईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास (Confidence) कमी होऊ शकतो.

नीटनेटके कपडे घाला

ज्या Interview साठी तुम्ही जात आहात त्या जागेसाठी योग्य वेषभूषा करा. बर्‍याच जॉब Interview साठी ड्रेस कोड (Dress code for Interview) असतो त्यानुसार कपडे घालून जा. अजिबात चमकदार कपडे घालू नका. कॅज्युअल (Casual wear) ऐवजी औपचारिक (Official wear) ड्रेस घाला. कपडे व्यवस्थित इस्त्री झाले आहेत का याची खात्री करा. शूज पॉलिश केले असणं आवश्यक आहे.तसंच महिलांनी अनावश्यक दागिने घालून  Interview ला जाऊ नका.

हे वाचा -गूढ गोष्टींचा शोध घेण्याची जिद्द आहे का? मग 'क्रिमिनॉलॉजी'मध्ये करा करिअर

कागदपत्रांची जुळवाजुळव करून ठेवा

आत्मविश्वासानं  Interview द्या. आपण  Interview मध्ये नक्की पास होऊ आणि ही नोकरी आपल्यालाच मिळेल या उद्देशानं  Interview द्या. त्यानंतर कागदपत्रांची (Documents during Interview) जुळवाजुळव करण्यात अडचण येऊ नये म्हणून आधीच कागदपत्रं सोबत असू द्या.

मध्येच टोकू नका

जेव्हा Interview  घेणारा एखादा प्रश्न विचारत असेल तर त्या दरम्यान काहीही बोलू नका. काळजीपूर्वक ऐका आणि नंतर संपूर्ण प्रश्नाचं उत्तर द्या. जास्त बोलू नका. आपल्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वासनं भरलेलं हसू ठेवा.

कंपनीबाबत वाईट बोलू नका

जेव्हा लोक नवीन नोकरीसाठी मुलाखत देतात तेव्हा त्यांना नक्की विचारलं जातं की तुम्हाला जुनी नोकरी का सोडायची आहे? किंवा काय समस्या आहे? अशावेळी या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजतेनं आणि सकारात्मक पद्धतीनं द्या. आधीच्या कंपनीबाबत कधीच वाईट गोष्टी सांगू नका.

First published:

Tags: Career opportunities